Sanjiv Goenka Gifted Mercedes Car To Mukul Choudhary : इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला (LSG) अशक्यप्राय विजय मिळवून देणारा युवा फलंदाज मुकुल चौधरी सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. मुकुलने केलेल्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर एक मोठी बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी मुकुलच्या कामगिरीवर खूश होऊन त्याला 4.10 कोटी रुपये किमतीची आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ मेबॅक GLS’ (Mercedes-Benz Maybach GLS) कार भेट दिल्याचे दावे केले जात आहेत.
मैदानावर मुकुलचा पराक्रम
ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात लखनौचा संघ एका वेळी पराभवाच्या छायेत होता. मात्र, 21 वर्षीय मुकुल चौधरीने केवळ 27 चेंडूंत 7 उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांची खेळी करत सामना लखनौच्या खिशात टाकला. त्याच्या या खेळीने केवळ चाहतेच नव्हे, तर संघाचे मालक संजीव गोयंका देखील भावूक झालेले पाहायला मिळाले.
🚨 SANJIV GOYENKA'S SPECIAL GIFT FOR LSG'S NEW HERO MUKUL CHOUDHARY 🚨
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) April 11, 2026
– The Lucknow Super Giants owner has reportedly gifted a luxurious Mercedes-Benz Maybach GLS (worth ₹4.10 crore) to rising star Mukul Chaudhary following his unforgettable match-winning performance against… pic.twitter.com/EprQIyoomj
हेही वाचा – जेव्हा टॉम क्रूझला पडली भारतीय चवीची भुरळ; आशा भोसले यांच्या रेस्टॉरंटमध्ये एकाच डिशची दोनदा ऑर्डर!
संघर्षाची कहाणी: वडिलांनी घर विकले, तुरुंगवास भोगला
मुकुल चौधरीचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील मुकुलच्या वडिलांनी, दलिप चौधरी यांनी आपल्या मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले राहते घर 21 लाख रुपयांना विकले होते. इतकेच नाही, तर प्रशिक्षणासाठी घेतलेले कर्ज न फेडू शकल्याने त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. नातेवाईकांनी ‘वेडा’ म्हटल्यानंतरही दलिप यांनी हार मानली नाही आणि आज त्यांच्या मुलाने आयपीएलच्या मंचावर स्वतःचे नाव कोरले आहे.
मर्सिडीज गिफ्ट केल्याच्या दाव्याचे सत्य काय?
सोशल मीडियावर संजीव गोयंका यांनी मुकुलला 4.10 कोटींची कार गिफ्ट केल्याचे फोटो आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप लखनौ सुपर जायंट्स संघ किंवा संजीव गोयंका यांच्याकडून अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक क्रीडा विश्लेषकांच्या मते, ही माहिती सोशल मीडियावरील अफवा असू शकते. संजीव गोयंका यांनी मुकुलच्या खेळीचे भरभरून कौतुक नक्कीच केले आहे, परंतु कार भेट दिल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मुकुल चौधरीने आपल्या या कामगिरीचे श्रेय वडीलांचे कष्ट आणि आपला आदर्श एमएस धोनी याला दिले आहे. लखनौ संघाने त्याला लिलावात 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले होते, आणि पहिल्याच मोठ्या संधीचे त्याने सोने केले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा