

Sanju Samson about Mohanlal : एशिया कप 2025 मध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध सामना जिंकला असला तरी, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयांनी संजू सॅमसनच्या चाहत्यांमध्ये संताप उसळला आहे. संजूची बॅटिंग ऑर्डर सातत्याने बदलली जात आहे. एकीकडे त्याला एकाही ठराविक स्थानावर खेळू दिलं जात नाही, तर दुसरीकडे त्याच्यावर विश्वास दाखवण्याऐवजी अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलं.
“मी मोहनलाल आहे… जो काहीही करू शकतो”
सामन्यापूर्वी सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत संजूने एक अफाट तुलना केली. “जसं आपले अभिनेता मोहनलाल – ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला – त्यांनी 30–40 वर्षे वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, तसंच मला देखील टीमसाठी कुठलीही भूमिका स्वीकारावी लागेल,” असं म्हणत त्याने आपल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मान्य केल्या.
“मी भारतासाठी 10 वर्षे खेळतोय, मी म्हणू शकत नाही की फक्त हिरोचाच रोल करू शकतो. जोकर, व्हिलन सुद्धा बनायला हवं,” असं म्हणत त्याने आपल्या भूमिकेविषयी खुलं बोलणं केलं.
इधर-उधर संजूची फिरवणूक!
2024 मध्ये ओपनर म्हणून तीन शतके झळकावणाऱ्या संजूला शुबमन गिलच्या पुनरागमनानंतर ओपनिंगमधून वगळण्यात आले. पाकिस्तानविरुद्ध नंबर 5 तर बांगलादेशविरुद्ध थेट नंबर 8 वर!
Sanju Samson’s villain arc loading… 🦹♂️🔥
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 24, 2025
Catch him in action LIVE NOW in #INDvBAN, on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/JZ5TVmNYaY
हेही वाचा – दिल्लीत वेगाने पसरतोय ‘हाच’ जीवघेणा व्हायरस! लक्षणं, उपचार आणि धोका काय? जाणून घ्या सविस्तर
त्याला बॅटिंगची संधीच न मिळाल्याने चाहत्यांनी ट्विटरवर हॅशटॅग चालवत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर सडकून टीका केली. “संजू सॅमसनवर अन्याय होतोय,” असं चाहते म्हणतात.
भारताची फायनलमध्ये दमदार एन्ट्री
शर्माच्या फटकेबाजीमुळे भारताने 6 विकेट्सवर 168 धावा केल्या. बॉलिंग युनिटने बांगलादेशला 127 धावांत रोखून 41 धावांनी विजय मिळवला आणि फायनलमध्ये धडक मारली.
जितेश शर्मा VS संजू?
टीम आता श्रीलंकेविरुद्ध अनौपचारिक सामन्यात संजूला नंबर 3 वर संधी देणार का? की जितेश शर्माला संधी देऊन बेंच स्ट्रेंथ तपासणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा