IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची पहिली आयपीएल विकेट आणि मुंबईचा विजय..! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Arjun Tendulkar First wicket : मुंबई इंडियन्सचा उदयोन्मुख खेळाडू आणि क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पहिली आयपीएल विकेट मिळाली आहे. हैदराबादमध्ये रंगलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH vs MI) सामन्यात अर्जुनने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकरवी झेलबाद करत ही विकेट घेतली. या विकेटसह मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावा असताना अर्जुनने मुंबईसाठी 20वे षटक टाकले. या सामन्यात अर्जुनने 2.5 षटकात 18 धावा दिल्या.

या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. कॅमेरून ग्रीनच्या नाबाद 64 धावा (6 चौकार आणि 2 षटकार) आणि तिलक वर्माच्या 37 धावांच्या (2 चौकार आणि 4 षटकार) जोरावर 20 षटकात 5 बाद 192 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 178 धावाच करता आल्या.

हेही वाचा – Mafia : मोठ्या गुंडांना ‘माफिया’ का म्हणतात? हा शब्द आला कुठून?

दोन्ही संघाची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन/अब्दुल समद (इम्पॅक्ट खेळाडू).

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा/जेसन बेहरेनडॉर्फ (इम्पॅक्ट खेळाडू), कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, पीयुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment