IPL 2023 : श्यॅsss..! CSK च्या ‘दिग्गज’ खेळाडूनं सोडलं आयपीएल; यंदाही ट्रॉफी नाहीच?

WhatsApp Group

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलला अलविदा केला आहे. वृत्तानुसार, ड्वेन ब्राव्हो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही आणि त्यामुळेच त्याने आगामी लिलावासाठी आपले नाव पाठवलेले नाही. चेन्नई सुपर किंग्जने त्याला या हंगामाच्या लिलावापूर्वी सोडले. ESPN Criinfo च्या रिपोर्टनुसार, ड्वेन ब्रावोने आयपीएल २०२३च्या लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही. याचा अर्थ आता तो पुढील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघातून सोडले. ब्राव्हो या संघाकडून दीर्घकाळ खेळला आहे. ब्राव्हो २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला होता. तो एक दशकाहून अधिक काळ चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. यावेळी त्याला संघाबाहेर ठेवून नवे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या मोसमात ड्वेन ब्राव्होला चेन्नई सुपर किंग्जने ४.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने १० सामन्यात १६ विकेट घेतल्या.
आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी खेळाडूंची मूळ किंमत समोर आली आहे. केन विल्यमसन, बेन स्टोक्स, जिमी नीशम, निकोलस पूरन आणि जेसन होल्डर या खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजनेही स्वतःला दोन कोटींच्या मूळ किमतीच्या श्रेणीत ठेवले आहे.’

हेही वाचा – Post Office Scheme : दररोज फक्त ५० रुपये भरा आणि मिळवा ३५ लाख..! वाचा ‘या’ प्लॅनविषयी

आयपीएल २०२२च्या लिलावासाठी एकूण ९९१ खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. टी-२० विश्वचषकाचा सामनावीर सॅम करणचाही दोन कोटींच्या मूळ किमतीत समावेश आहे. जर आपण इतर खेळाडूंबद्दल बोललो तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने देखील स्वतःची मूळ किंमत दोन कोटी ठेवली आहे. दुसरीकडे, मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स हेल्स या खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे पाठवली नाहीत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment