IND vs BAN : रोहित शर्मापुढं एक नव्हे, तर ‘ही’ दोन संकटं..! ‘अशी’ असू शकते Playing 11

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs BAN : टीम इंडियाला रविवारी टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच पराभव ठरला. पर्थच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. आता भारतीय संघ अॅडलेडला पोहोचला आहे, जिथे त्यांना २ नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करायचा आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर दोन मोठी कामे आहेत. प्रथम, पर्थमधील पराभवाचे कारण शोधणे आणि दुसरे, त्या पराभवातून धडा घेत बांगलादेशविरुद्ध अशा प्लेइंग इलेव्हनची निवड करणे, ज्यामुळे विजय मिळू शकेल. मात्र, प्लेइंग इलेव्हनच्या निवडीबाबत प्रशिक्षक आणि कर्णधारासमोर पेच नक्कीच असेल. विशेषत: केएल राहुल आणि दिनेश कार्तिक यांच्या अलीकडच्या कामगिरीचा विचार करता.

केएल राहुलसाठी टी-२० विश्वचषक आतापर्यंत चांगला गेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या ४, ९ आणि ९ अशी आहे. फलंदाजी करताना त्याच्यात आत्मविश्वास दिसत नाही. त्याचे पाय हलत नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघ पुढील सामन्यांमध्येही सलामीवीर म्हणून राहुलवर विसंबून राहणार की ऋषभ पंत किंवा आघाडीच्या फळीतील अन्य कोणत्याही फलंदाजाला संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अपयशी ठरल्यानंतरही दिनेश कार्तिक मॅच फिनिशरची भूमिका निभावणार का?

हेही वाचा – Gujarat Morbi Bridge Collapse : दुर्घटनेनंतर पहिली ‘मोठी’ कारवाई; ‘या’ कंपनीच्या ९ लोकांना ठोकल्या बेड्या!

सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा कार्तिकचे नाव नव्हते, मात्र मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी ऑस्ट्रेलियातील संघ व्यवस्थापनाच्या निवडीच्या पर्यायांवर काहीही बोलणे टाळले.

बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची संभाव्य Playing 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, हुडा, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन/अक्षर पटेल, शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment