IND vs ENG Semifinal : दोन्ही संघांच्या Playing 11 मध्ये बदल..! ‘अशी’ असू शकते टीम इंडिया

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal Playing 11 : टी-२० वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन काय असेल, हा एक मोठा प्रश्न असेल. भारतीय संघात दोन बदल पाहायला मिळू शकतात, तर इंग्लंड संघाला त्यांच्या शेवटच्या अकरामध्ये बदल करणे भाग पडणार आहे, कारण संघाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत.

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक एकत्र खेळतील की डावखुरा फलंदाज म्हणून पंतला संधी मिळेल हा सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. याशिवाय आणखी एक बदल म्हणजे भारतीय संघ आपला फिरकी विभाग मजबूत करण्यासाठी अक्षर पटेलच्या जागी युझवेंद्र चहलला संधी देऊ शकतो. या दोन बदलांना वाव भारताच्या संघात आहे.

हेही वाचा – IND Vs ENG Semifinal : “मॅच जिंकण्यासाठी…”, सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माचं वक्तव्य!

इंग्लिश संघाबद्दल बोलायचे झाले तर, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होणार आहेत. डेव्हिड मलान अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यांच्या जागी फिल सॉल्टला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वेगवान गोलंदाज मार्क वुडने बुधवारी गोलंदाजी केली, पण तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्या जागी ख्रिस जॉर्डनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

दोन्ही संघ –

भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल/युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.

इंग्लंड : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (कप्तान आणि यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/ख्रिस जॉर्डन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment