T20 World Cup 2022 IND vs PAK : हुश्श…! चुरशीच्या लढतीत भारताचा ‘विराट’ विजय; किंग चमकला!

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs PAK : विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या अप्रतिम, नेत्रदीपक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये विजयाचे खाते उघडले आहे. भारताने पहिल्या आणि चुरशीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४ गड्यांनी पराभव केला. ३१ धावांवर ४ गडी बाद झाले असताना विराट मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच पालटले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह भारताने मागील विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आहे.

भारताचा डाव

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. वेगवान गोलंदाज नसीम शाहने केएल राहुलला (४) तर हारिस रौफने रोहित शर्माला (४) बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनेही (१५) निराशा केली. रौफने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने यांनी डाव सांभाळत संघाला शतक गाठून दिले. शेवटच्या दोन षटकात हार्दिक बादल झाला. पण विराटने शर्थीची झुंज देत सामना पाकिस्तानच्या तोंडातून हिसकावून घेतला. विराटने ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ चौकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली. हार्दिकने १ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या.

हेही वाचा – Amitabh Bachchan : ‘बिग बीं’चा अपघात, रक्त वाहत असल्यामुळं हॉस्पिटलमध्ये नेलं!

पाकिस्तानचा डाव

पाकिस्तानची सुपरहिट ओपनिंग जोडी मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम टीम इंडियाच्या युवा अर्शदीप सिंगपुढे नतमस्तक झाले. अर्शदीपने आपल्या पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्या चेंडूवर बाबरला शून्यावर पायचीत पकडले. अर्शदीपने रिझवानला भुवनेश्वकरवी झेलबाद केले. त्यानंतर शाद मसुद आणि इफ्तिखार अहमद यांनी अर्धशतके ठोकत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. अहमदने २ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. आक्रमक झालेल्या अहमदला मोहम्मद शमीने १३व्या षटकात पायचीत पकडले. हैदर अली, आसिफ अली हे फलंदाज खास कामगिरी करू शकले नाही. पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप आणि हार्दिकने प्रत्येकी ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11 :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment