T20 World Cup 2022 IND vs PAK : मॅचला सुरुवात..! ‘या’ कॅप्टननं जिंकला टॉस; बॉलिंगचा निर्णय!

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs PAK : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज टी-२० विश्वचषक सुपर १२ मधील ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करत आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगत आहे. या वर्षातील दोन्ही संघांची ही तिसरी भेट आहे. याआधी नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोघेही दोनदा आमनेसामने आले होते जिथे दोघांनी प्रत्येक सामना जिंकला होता. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आफ्रिदी विरुद्ध शमी!

पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे तर मोहम्मद शमी कोविडमधून बरा झाल्यानंतर टीम इंडियात परतला आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी शमीचा भारताच्या टी-२० विश्वचषकाच्या १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – Diwali 2022 : दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना CM शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

दोन्ही संघांची Playing 11 :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment