

T20 World Cup 2022 IND vs PAK : भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने केलेल्या शानदार विजयानंतर संपूर्ण जग पुन्हा एकदा विराट कोहलीचे चाहते झाले आहे. अलीकडेपर्यंत, टी-२० संघातील कोहलीच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या क्रिकेटपंडितांनी रविवारी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कोहलीच्या ‘मास्टर क्लास’ खेळीशिवाय, रवीचंद्रन अश्विनने या सामन्यादरम्यान दाखवलेला चाणाक्षपणाही कौतुकास पात्र आहे. भारताला शेवटच्या चेंडूवर दोन्ही धावांची गरज असताना अश्विन फलंदाजीला आला, तेव्हा अश्विनने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून प्रत्येक भारतीय चाहत्यांची मने जिंकली.
अश्विन जसा त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो तसेच तो खेळाच्या इतर भागांमध्ये देखील त्याच्या चातुर्याचा वापर करताना दिसतो. रविवारी रात्री सामना अटीतटीचा झाला असतानाही अश्विनने पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांची मने जिंकली. दिनेश कार्तिक घाबरलेल्या अवस्थेत आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर अश्विन क्रीझवर आला. भारत-पाकिस्तान सामन्यात दडपणाच्या प्रकारात अशी चूक होणे स्वाभाविक आहे, पण अश्विनने कोणतेही दडपण दाखवले नाही.
हेही वाचा – IND Vs PAK : चुरशीची मॅच आणि गेला जीव..! व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू
अश्विनची हुशारी
मोहम्मद नवाजच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनने पुढचा पाय उशीरा यष्टीच्या बाहेर थोडासा ठेवला. अश्विनची भूमिका पाहून नवाजला वाटले की तो विकेटच्या बाहेर शॉट घेईल, त्यामुळे त्याने लेग-स्टंपर गोलंदाजी केली. पण चेंडू टाकण्यापूर्वी अश्विन बॅकफूटवर गेला आणि चेंडू लेग साईडला गेल्याचे पाहून त्याने तो सोडण्याचा निर्णय घेतला. अश्विनच्या या हुशारीमुळे येथे भारताला वाईडच्या स्वरुपात एक धाव मिळाली. अश्विनने शेवटच्या चेंडूवर मिड ऑफवर शानदार शॉट खेळून संघाला विजय मिळवून दिला.
This pic.twitter.com/Pg4QN5LSzO
— AP (@ap_pune) October 23, 2022
हेही वाचा – शिंदे गटाचे ‘इतके’ आमदार BJP मध्ये जाणार..! ठाकरे गटाचा ‘खळबळजनक’ दावा
विराट काय म्हणाला?
विराट मॅचनंतर म्हणाला, ”जेव्हा तुम्हाला १५-१६ रन रेट हवा असेल आणि नंतर दोन चेंडूत दोन धावा होतात, तेव्हा लोक उत्साहित होतात की ते पूर्ण झाले. मग डीके रन आऊट झाला. मग मी अश्विनला कव्हर्स बघायला सांगितले. पण अॅशने त्याच्या डोक्यावर अधिक डोक लावले. हे एक धाडसी कृत्य होते.”
A game awareness like none other, @ashwinravi99 for you, ladies & gentlemen! 🙌
Revisit the crucial moment with @imVkohli & watch more insights into his game before Team India face Netherlands!#CricketLIVE: Every matchday | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/UAhPXlp15H
— Star Sports (@StarSportsIndia) October 24, 2022