

T20 World Cup 2022 IND vs PAK : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज काही क्षणांत महामुकाबला खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता आणि यावेळी भारतीय संघ त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन कशा असतील, जाणून घेऊ.
हवामान कसे असेल?
मेलबर्नमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. Weather.com च्या मते, रविवारीही पावसाची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दीड वाजता सुरू होणार असला तरी मेलबर्नमध्ये त्यावेळी रात्रीचे ७ वाजले असतील. मेलबर्नमध्ये रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु दिवसा आकाश निरभ्र असेल.
Pre-match build-ups done ✅
Team preparations done ✅
IT IS TIME FOR #INDvsPAK 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/QPyMQrbZVI
— BCCI (@BCCI) October 23, 2022
हेही वाचा – Bigg Boss Marathi : विशाल, जय, विकास आणि मीनल पुन्हा एकत्र..! पाहा Video
🔥🔥कोण जिंकणार महामुकाबला? #INDvPAK #INDvsPAK #T20worldcup22 #vachamarathi #T20WorldCup2022 pic.twitter.com/6PcoC5PO5b
— Vacha Marathi (@VachaMarathi) October 22, 2022
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.