

T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक २०२२ सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शाहीन आफ्रिदीने सराव सामन्यात घातक गोलंदाजी करताना टीम इंडियासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानला विश्वचषकातील पहिला सामना भारताविरुद्ध २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये खेळायचा आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ बुधवारी आपला दुसरा सराव सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. यामध्ये शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात प्राणघातक गोलंदाजी केली आणि अचूक यॉर्कर टाकताना अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत होता. आफ्रिदीने पहिले षटक टाकले. षटकातील पाचवा चेंडू त्याने यॉर्कर अतिशय वेगाने टाकला, जो गुरबाज खेळू शकला नाही आणि चेंडू थेट त्याच्या डाव्या पायाच्या बोटाला लागला. चेंडू लागल्यानंतर गुरबाज वेदनेने ओरडू लागला आणि अंपायरने त्याला एलबीडब्ल्यूही आऊट दिले.
Shaheen and a wicket in the first over from a Yorker love story continues >>
Full, Swinging, Fast.. Bang in front
The eagle is officially back 🦅🦅🦅#ShaheenShahAfridi #PAKvAFG #T20WorldCup pic.twitter.com/6RGeiPUas6— Malik Allah Rakha (@MalicAllahRakha) October 19, 2022
Strom❤️❤️#PAKvAFG#ShaheenShahAfridi pic.twitter.com/Wm1jjjb1yE
— IBN UL-HAYTHAM 🇵🇰 (@ZARARKHAN80) October 19, 2022
Art Artist#ShaheenShahAfridi pic.twitter.com/KgAczVyddP
— 𝐂𝐫𝐢𝐜 𝐕𝐢𝐛𝐞𝐬𝐬 🇵🇰✨ (@Cric_vibes) October 19, 2022
हेही वाचा – गोड बातमी…! सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन; शिंदे सरकारचा निर्णय!
Shaheen Shah Afridi and Babar Azam with Rahmanullah Gurbaz after the game.
The Afghanistan opener injured his foot after a toe-crushing Shaheen yorker.#PAKvAFG | #T20WorldCup pic.twitter.com/puKJDMhpUV
— Grassroots Cricket (@grassrootscric) October 19, 2022
गुरबाजची प्रकृती इतकी बिकट झाली की त्याला चालताही येत नव्हते. यानंतर कर्मचारी आणि खेळाडू ड्रेसिंग रूममधून आले आणि गुरबाजला पाठीवर घेऊन बाहेर गेले. गुरबाजला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकलेले नाही. मात्र दुखापत गंभीर झाल्यास विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीने ४ षटके टाकली आणि त्यात २९ धावांत २ बळी घेतले. याआधी शाहीनने इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने २ षटके टाकली होती आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. या सराव सामन्यात अफगाणिस्तानने ६ बाद १५४ धावा केल्या. यामध्ये कर्णधार मोहम्मद नबीने ५१ धावांची खेळी केली.