टीम इंडियाच्या स्टार पेसरला सरकारी नोटीस; गाडी जप्त करण्याचा इशारा!

WhatsApp Group

Akash Deep Fortuner Registration Issue : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप सिंह (Akash Deep Singh) नुकताच इंग्लंड दौऱ्यातील झंझावाती प्रदर्शनामुळे चर्चेत आला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने लखनऊमधील एका डीलरकडून काळ्या रंगाची टॉप मॉडेल टोयोटा फॉर्च्यूनर (Toyota Fortuner) खरेदी केली. या लक्झरी कारच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. पण आता हीच गाडी त्याच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.

उत्तर प्रदेशच्या ट्रान्सपोर्ट विभागाने आकाश दीपला व डीलर सनी मोटर्स, लखनऊ यांना कारण दाखवा नोटीस पाठवली आहे. केंद्रीय मोटरयान नियमावली 1989 च्या नियम 44 अंतर्गत ही कार बिनरजिस्ट्रेशन डिलिव्हर केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आकाश दीपने त्याच्या कारसाठी UP32QW0041 हा फॅन्सी नंबर घेतला होता. मात्र, वाहनाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) आणि तिसरा रजिस्ट्रेशन मार्क न लावता गाडी देण्यात आली.

हेही वाचा – विराट आणि डिविलियर्सचा छत्तीसगडच्या मुलाला कॉल, तुमच्या सिमवरही होऊ शकतो असा ‘कांड’!

ARTO लखनऊच्या तपासणीत या गोष्टी समोर आल्या —

  • गाडीची विक्री तारीख: 7 ऑगस्ट
  • इन्शुरन्स तारीख: 8 जुलै
  • रोड टॅक्स अद्याप भरलेला नाही
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया अपूर्ण

कायदेशीर कारवाईची तयारी

मोटरयान कायदा 1988 च्या धारा 39, 41(6) आणि 207 अंतर्गत आकाश दीपला नोटीस देण्यात आली आहे. त्याला स्पष्ट निर्देश दिले आहेत की रजिस्ट्रेशन, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणि तिसरा रजिस्ट्रेशन मार्क लावून, वैध इन्शुरन्स पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर गाडी चालवू नये. जर आदेशाचे उल्लंघन झाले, तर गाडी जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल. यापूर्वी 9 ऑगस्टला देखील बिनरजिस्ट्रेशन गाडी चालवल्यामुळे आकाश दीपचे चलान कापण्यात आला होता.

‘ड्रीम डिलिव्हर’ ते ‘लीगल ट्रबल’!

फॉर्च्यूनर खरेदी केल्यानंतर आकाश दीपने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते — “Dream deliver हो गया है… चाबी हाथ में आ गई है, उन लोगों के साथ जो सबसे ज्यादा मायने रखते हैं.” पण आनंदाच्या या क्षणाला लवकरच कायदेशीर वादळाने झाकलं आहे.

क्रिकेटमधील फॉर्म

इंग्लंडविरुद्धच्या ताज्या मालिकेत आकाश दीप यांनी दुसऱ्या कसोटीत तब्बल 10 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच पाचव्या कसोटीत फलंदाजीतही महत्वाची खेळी करून टीमला आधार दिला होता. आता मात्र मैदानाबाहेर, एका लक्झरी कारने त्याला कोर्टरूममध्ये खेचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment