

Team India Head Coach : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण १८ नोव्हेंबरपासून त्यांच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचा प्रवास संपल्यानंतर नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हृषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले हे न्यूझीलंडच्या फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एनसीए प्रमुख लक्ष्मण यांनी या वर्षीच्या आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यात तसेच गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होम वनडे मालिकेत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल, त्यातील पहिला सामना शुक्रवारी खेळवला जाईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून त्यातील शेवटचा सामना ३० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
हेही वाचा – मोठी बातमी..! राजीव गांधी यांच्या हत्येतील सर्व ६ दोषींची सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
द्रविड ४ डिसेंबरपासून बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघात सामील होणार आहे. भारत त्यांच्या बांगलादेश दौऱ्यावर पहिले तीन एकदिवसीय सामने खेळेल, त्यानंतर १४ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. न्यूझीलंड दौऱ्यासाठी मर्यादित षटकांचा संघ कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याला टी-२० आणि शिखर धवनला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गुरुवारी (१० नोव्हेंबर) अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून १० गडी राखून पराभूत होऊन भारत टी-२० विश्वचषकातून बाद झाला.
VVS Laxman appointed India head coach for New Zealand tour, Dravid rested
Read @ANI Story | https://t.co/rGizMDU75F#Indiacoach #RahulDravid #VVSLaxman #BCCI pic.twitter.com/RAxaCmqQYQ
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2022
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्शल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उप-कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.