

WI vs IND 1st ODI : वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली वनडे भारताने खिशात घातली आहे. बार्बाडोस येथे रंगलेल्या या सामन्यात भारताच वरचष्मा पाहायला मिळाला. भारताने हा सामना 5 गडी राखून जिंकला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या भारताने अवघ्या 114 धावांवर वेस्ट इंडिजला गुंडाळले.
विंडीज 114 धावांवर ऑलआऊट!
भारतीय गोलंदाजांनी रचलेल्या फिरकीत वेस्ट इंडिज फलंदाज अडकले आणि त्यांना 114 धावाच करता आल्या. विंडीजचा संघ अवघ्या 23 षटकातच ऑलआऊट झाला. विंडीजकडून कप्तान शाय होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला इतर कुणाचीही साथ लाभली नाही. भारताकडून कुलदीप यादवने फक्त 6 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर जडेजाने 3 विकेट्स काढल्या. पदार्पणवीर मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Rohit Sharma hits the winning runs for India. 💥
Indian Team won the first ODI of the series. ✅#INDVsWI pic.twitter.com/43V90Z5c24
— 12th Khiladi (@12th_khiladi) July 27, 2023
हेही वाचा – Video : संजू सॅमसनची जर्सी घालून सूर्याचा सुपला शॉट! चेंडू आरपार
प्रत्युत्तरात इशान किशन आणि शुबमन गिलने भारतासाठी सलामी दिली. शुबमन गिल (7), सूर्यकुमार यादव (19), हार्दिक पांड्या (5), शार्दुल ठाकूर (1) या क्रमाने भारतीय संघाने मैदानात फलंदाजी उतरवली. इशान किशनने 7 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताने 22.5 षटकात ही धावसंख्या गाठली. विंडीजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – शाय होप (विकेटकीपर/कप्तान), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, एलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!