

WI vs IND 1st T20 : एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारत आणि वेस्ट इंडिज संघ टी-20 सामन्यात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला आहे. आज पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने याआधीच कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. टीम इंडियाच्या नजरा आता टी-20 मालिकेवरही खिळल्या आहेत. कधी, कुठे आणि कसा सामना पाहायचा ते जाणून घ्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही भारतातील दूरदर्शन नेटवर्कच्या वाहिन्यांवर थेट पाहू शकता. तुम्ही Jio सिनेमा अॅप आणि फॅन कोडवर पहिला टी-20 लाइव्ह पाहू शकता.
📸🤝
T20I mode 🔛#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/Ftpp4AINGI
— BCCI (@BCCI) August 3, 2023
हेही वाचा – गोव्याच्या ‘मानकुराद’ आंब्याला मिळाला GI टॅग! जाणून घ्या आंब्याची खासियत
दोन्ही संघांची संभाव्य Playing 11
भारत – इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा/यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, शाई होप, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय, ओशान थॉमस.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!