WI vs IND 1st Test : चंदरपॉलच्या पोराला बोल्ड करत अश्विनने रचला रेकॉर्ड! पाहा Video

WhatsApp Group

WI vs IND 1st Test Ravichandran Ashwin : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कॅरेबियन कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट हे भारतीय वेगवान गोलंदाज विकेट्ससाठी आसुसलेले दिसले. त्याचवेळी रवीचंद्रन अश्विनने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये आणि खेळाच्या पहिल्या तासात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने टेगनारायण चंदरपॉलला 12 धावांवर क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

भारताकडून पिता-पुत्र दोघांनाही बाद करणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने यापूर्वी 2011 मध्ये शिवनारायण चंदरपॉलला बाद केले होते. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर 2023 मध्ये त्याने त्याचा मुलगा टेगनारायण चंदरपॉललाही बाद केले.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : ‘फ्लाईंग’ मोहम्मद सिराजने घेतला अफलातून कॅच! पाहा Video

भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स (बोल्ड)

  • 95 – रवीचंद्रन अश्विन
  • 94 – अनिल कुंबळे
  • 88 – कपिल देव
  • 66 – मोहम्मद शमी

अश्विनला गेल्या महिन्यात लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. टीम इंडियाला सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. ताज्या कसोटी क्रमवारीत अश्विन हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे आता कसोटी क्रिकेटमध्ये 476 विकेट्स आहेत. अनिल कुंबळेनंतर तो सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment