WI vs IND 1st Test : या वेस्ट इंडिजपेक्षा शाळेची टीम बरी! अश्विनने लूटल्या 5 विकेट्स

WhatsApp Group

WI vs IND 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अपेक्षेप्रमाणे भारताचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी विंडीजचा पूर्ण संघ 64.3 षटकात 150 धावांवर आटोपला. विंडीजचा कप्तान क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजकडून पदार्पणवीर एलिक अथानाझे वगळता एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. मैदानात उतरण्यापूर्वीच पराभव मान्य झाल्याची वृत्ती विंडीजच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाली.

भारताकडून रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 60 धावांत 5 बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. त्याने सलामीवीर टेगनारायन चंदरपॉल (12), कप्तान क्रेग ब्रेथवेट (20), एलिक अथानाझे (47), जोशुआ डा सिल्वा (2) आणि जोमेल वॉरिकन (1) यांना बाद केले. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 26 धावांत 3 बळी घेतले. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या डावाची सुरुवात केली आहे.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : 700 इंटरनॅशनल विकेट्स, रवीचंद्रन अश्विनचा महारेकॉर्ड!

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment