WI vs IND 2nd T20 : एकटा लढला तिलक वर्मा, बॅटिंगमध्ये भारताचा फ्लॉप शो!

WhatsApp Group

WI vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या घातक गोलंदाजापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला 153 धावांचे आव्हान दिले आहे.

भारताचा डाव

भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने केवळ 18 धावांत 2 गडी गमावले. प्रथम अल्झारी जोसेफने शुबमन गिलला शिकार बनवले. 7 धावा करून गिल झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव (1) धावबाद झाला. टीम इंडियाने 60 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली. रोमॅरियो शेफर्डने इशान किशनला क्लीन बोल्ड केले. इशानने 27 धावा केल्या. यानंतर फिरकी गोलंदाज अकिल होसेनच्या चेंडूवर संजू सॅमसन यष्टीचीत झाला. संजूने 7 धावा केल्या. युवा फलंदाज तिलक वर्माने हार्दिक पांड्यासोबत संघाला शतकापार पोहोचवले. तिलकने आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक साकारले. तिलकने 5 चौकार आणि एका षटकारासह 51 धावा केल्या. अकिलने त्याला झेलबाद केले. 114 धावांवर भारताचा अर्धा संघ गारद झाला. कप्तान हार्दिक पांड्याही (24) मोठी खेळी करू शकला नाही. 20 षटकात भारताने 7 बाद 152 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, रोमॅरियो शेफर्ड यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.

हेही वाचा  – AI करणार नव्या संसद भवनाचे रक्षण, दरवाजांवर असेल खास डिव्हाईस!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment