

WI vs IND 2nd Test Ajinkya Rahane Wicket : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना त्रिनिदाद (पोर्ट ऑफ स्पेन) येथील क्वीन्स पार्क मैदानावर खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात भारताच्या पहिल्या डावात 4 बाद 186 धावा झाल्या.. विराट कोहली 19 आणि रवींद्र जडेजा 3 धावांवर खेळत आहे.
भारताचा उपकप्तान अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला. त्याला फक्त 8 धावाच करता आल्या. वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलने त्याला बोल्ड केले.
तत्पूर्वी, सलामीवीर रोहित शर्मा (80 धावा), शुबमन गिल (10 धावा), यशस्वी जैस्वाल (57 धावा) बाद झाले. केमार रोच, शॅनन गॅब्रिएल, जोमेल वॅरिकन आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
West Indies have crawled back into the game courtesy of some disciplined bowling!
.
.#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/S3oSs17doW— FanCode (@FanCode) July 20, 2023
An absolute ripper from Shannon Gabriel 🔥
Ajinkya Rahane departs for just 8 runs.
📸: Jio Cinema pic.twitter.com/1ahm5eq7N6
— CricTracker (@Cricketracker) July 20, 2023
हेही वाचा – कितीही पूर आला, तरी ताजमहालमध्ये पाणी घुसू शकत नाही!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज – क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!