WI vs IND 2nd Test : भारत पहिल्या डावात ऑलआऊट! विराटचे शतक, चौघांची अर्धशतके!

WhatsApp Group

WI vs IND 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होत आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 438 धावांवर आटोपला आहे. भारताकडून विराट कोहलीने 121 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार ठोकले.

कप्तान रोहित शर्मा (80), रवींद्र जडेजा (61), यशस्वी जयस्वाल (57) आणि आर. अश्विननेही (56) महत्त्वाचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॅरिकन यांनी 3-3 विकेट्स काढल्या. तर जेसन होल्डरने 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – अभिनेता विवेक ओबेरॉयला गंडवलं! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; 1.55 कोटी पळवले!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज – क्रेग ब्रॅथवेट (कप्तान), टेगनारायन चंदरपॉल, कर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment