“तू स्वार्थी कॅप्टन आहेस हार्दिक पांड्या, धोनीसारखं नाही जमायचं तुला”

WhatsApp Group

Hardik Pandya : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने हा सामना गमावला असता तर मालिका हाताबाहेर गेली असती, पण फलंदाज आणि गोलंदाजांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे आता मालिका 2-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

हार्दिक पांड्याने काय केले?

चाहत्यांना भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याचे एकही कृत्य अजिबात आवडले नाही आणि यासाठी सोशल मीडियावर त्याला शिवीगाळ केली जात आहे. हार्दिकने तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये विजयी षटकार ठोकला तेव्हा तिलक वर्मा दुसऱ्या टोकाला 49 धावांवर नाबाद होता आणि भारताला विजयासाठी 14 चेंडूत 2 धावांची गरज होती.

हार्दिक पांड्याला हवे असते तर तो एक धाव घेत तिलक वर्माला स्ट्राईक देऊ शकला असता आणि त्यानंतर तिलक आपले अर्धशतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून देऊ शकला असता, पण हार्दिक पांड्याने तसे केले नाही. हार्दिकने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला, पण तिलकला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. हार्दिकचे हे कृत्य चाहत्यांना आवडले नाही आणि त्याचे हे कृत्य खेळाच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले. हार्दिक पांड्या हा स्वार्थी कर्णधार असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – WI vs IND 3rd T20 : भारताचा पलटवार, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पाडाव!

धोनीची आठवण

हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यासोबतच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक जुना व्हिडिओ देखील यावेळी व्हायरल होत आहे, जो जुन्या सामन्यातील आहे. हा व्हिडिओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि विराट कोहली फलंदाजी करताना दिसत आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 7 चेंडूत 1 धावांची गरज होती आणि धोनी स्ट्राइकवर होता. धोनीने 49व्या षटकाचा शेवटचा चेंडू डॉट खेळला आणि 68 धावांवर फलंदाजी करणाऱ्या कोहलीला स्ट्राइक दिली. धोनीच्या या खेळाच्या भावनेने चाहत्यांची मने जिंकली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment