

मुंबई : भारताचा वेस्ट इंडिज दौरा (India Tour of West Indies) २२ जुलैपासून सुरू होतोय. या दौऱ्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. टीम इंडियानं इंग्लंडहून वेस्ट इंडिजला येण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटचा वापर केला. या सगळ्यात चार्टर्ड प्लेनची किंमत हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या प्रवासासाठी टीम इंडियानं करोडो रुपये खर्च केले आहेत. बीसीसीआयनं एवढा खर्च का केला याचं कारणही समोर आलं आहे.
नुकताच टीम इंडियाचा इंग्लंड दौरा पूर्ण झाला. टीम इंडिया इंग्लंडच्या मँचेस्टरहून थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचली. या फ्लाइटवर झालेल्या खर्चाची माहिती आता समोर आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाला इंग्लंडमधून वेस्ट इंडिजमध्ये आणण्यासाठी बीसीसीआयनं ३.५ कोटी रुपये खर्च केले. या चार्टर्ड फ्लाइटनं खेळाडूंना मँचेस्टरहून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आणलं आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला तीन एकदिवसीय सामन्यांची आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.
शिखर धवनला या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-२० मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होईल.
Trinidad – WE ARE HERE! 👋😃#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/f855iUr9Lq
— BCCI (@BCCI) July 20, 2022
…म्हणून हा निर्णय घेतला!
टीम इंडियाच्या चार्टर्ड फ्लाइटमधून प्रवासाची बाब समोर आली तेव्हा असं मानले जात होतं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका सूत्रानं सांगितलं की, ‘बीसीसीआयनं चार्टर्ड फ्लाइटवर ३.५ कोटी रुपये खर्च केले, ज्यां टीमला मँचेस्टरहून पोर्ट ऑफ स्पेनला रात्री ११.३० पर्यंत नेले. संघासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक करण्याचं कारण कोरोना हे नव्हतं. कमर्शिअल फ्लाइटमध्ये इतकी तिकिटे बुक करणं अवघड आहे. भारतीय संघात प्रशिक्षक राहुल द्रविडसह १६ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य आहेत. वेस्ट इंडिजला गेलेल्या खेळाडूंच्या पत्नीही आहेत.
Gearing up for ODI No.1 against the West Indies 💪
Here's @ShubmanGill giving a lowdown on #TeamIndia's 🇮🇳 first net session in Trinidad 🇹🇹#WIvIND pic.twitter.com/oxF0dHJfOI
— BCCI (@BCCI) July 21, 2022
हा प्रवास कमी खर्चात करता आला असता
या विषयावर बोलताना सूत्रानं पुढं सांगितलं की, ‘सामान्यत: व्यावसायिक उड्डाणासाठी हा खर्च सुमारे २ कोटी रुपये असेल. मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या बिझनेस क्लासच्या तिकिटाची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. चार्टर्ड फ्लाइट अधिक महाग आहे, परंतु तो एक खर्चिक पर्याय आहे. मोठ्या फुटबॉल संघांची आता स्वतःची एक चार्टर्ड फ्लाइट आहे.
The #WIvIND ODI series begins tomorrow! 👍 👍
Drop a message in the comments below & cheer for #TeamIndia. 👏 👏 pic.twitter.com/fYudJX0De8
— BCCI (@BCCI) July 21, 2022
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.