

Dhoni IPL 2026 : भारतीय क्रिकेटचा लेजेंड आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. IPL 2026 मध्ये तो खेळणार की नाही, यावरून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. IPL 2026 चा हंगाम मार्च 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, तर याआधी डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान मेगा ऑक्शन होण्याचे संकेत आहेत.
धोनीचे काय म्हणणे ?
धोनीने याआधी अनेकदा स्पष्ट केले आहे की, तो आपला पुढील निर्णय केवळ फिटनेसच्या आधारे घेईल. कारण, तो वर्षात केवळ २ महिने क्रिकेट खेळतो, आणि उर्वरित वेळेस त्याला आपली फिटनेस टिकवून ठेवणे ही मोठी कसरत असते. गेल्या 2-3 हंगामांपासून तो गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. 2024 मध्ये त्याने याच दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील केली होती. त्यामुळे त्याचा खेळणे कायमच अनिश्चिततेच्या छायेत राहिले आहे.
हेही वाचा – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना दरमहा 2500 रुपयांचा थेट फायदा
श्रीनिवासनच्या पुनरागमनामुळे बदल?
RevSportz च्या रिपोर्टनुसार, CSK चे माजी मालक आणि BCCI चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या चेअरमनपदी परतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून संघ व्यवस्थापनापासून दूर असलेले श्रीनिवासन आता पुन्हा संघाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय होणार आहेत. याचा थेट परिणाम धोनीच्या भवितव्यावर होऊ शकतो. श्रीनिवासन आणि धोनी यांच्यातील घनिष्ठ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे धोनी IPL 2026 मध्ये पुन्हा मैदानावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तेही वयाच्या ४४व्या वर्षी!
CSKमध्ये धोनीचा निर्णय कसा घेतला जाणार?
CSKच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासनच्या पुनरागमनानंतर संघातील क्रिकेटविषयक सर्व निर्णय कर्णधार ऋतुराज गायकवाड, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, आणि धोनी घेणार आहेत. हे निर्णय मग अंतिम मंजुरीसाठी श्रीनिवासन यांच्याकडे पाठवले जातील.
या यंत्रणेमुळे धोनी IPL 2026 खेळणार की नाही, याचा निर्णय देखील ह्याच प्रक्रियेत घेतला जाणार आहे. सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी संकेत स्पष्ट आहेत – श्रीनिवासन आले आहेत, आणि धोनीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा