

World Cup 2023 NZ vs BAN Mushfiqur Rahim Wicket : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा 11 वा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड (BAN vs NZ) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 246 धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने शानदार अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर त्याला मॅट हेन्रीने क्लीन बोल्ड केले.
बांगलादेशची पडझड सांभाळत मुशफिकुर रहीमने फलंदाजी केली आणि आपल्या डावात 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 36 व्या षटकात तो बाद झाला. मॅट हेन्रीने मुशफिकुरला पायचित करण्यासाठी संथ ऑफ कटर चेंडू टाकला. जो त्याला कळायच्या आत स्टम्सवर जाऊन आदळला.
मुशफिकुर रहिमची विकेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
तत्पूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल्यमसनने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले. विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच सामना आहे. प्रथम खेळताना बांगलादेशने 9 गड्यांच्या मोबदल्यात 245 धावा केल्या. मुशफिकुर रहीमने 66, महमुदुल्लाहने नाबाद 41 आणि कर्णधार शाकिब अल हसनने 40 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 बळी घेतले. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांना 2-2 विकेट्स घेता आल्या.
दोन्ही संघांची Playing 11 (World Cup 2023 NZ vs BAN)
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
बांगलादेश : लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!