

WTC Final 2023 IND vs AUS Day 4 Stumps : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याच चौथ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 164 धावा केल्या. भारताला विजयासाठी अजून 280 धावा हव्या आहेत. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला आणि भारताला एकूण 444 धावांचे आव्हान दिले.
दुसऱ्या डावातही भारताची पहिली विकेट 41 धावांवर पडली. पुन्हा एकदा स्कटॉ बोलंडने शुबमन गिलला (18) कॅमेरून ग्रीनकरवी झेलबाद केले. ग्रीनचा हा झेल वादग्रस्त ठरला. जमिनीला स्पर्श झालेला असतानाही पंचांनी शुबमनला बाद दिले. त्यानंतर रोहित शर्माला नॅथन लायनने पायचीत पकडले. रोहितने 7 चौकार आणि एका षटकारासह 43 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराही (27) अनपेक्षित फटक्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी 71 धावांची नाबाद भागीदारी केली. विराट 7 चौकारांसह 44 तर अजिंक्य 3 चौकारांसह 20 धावांवर नाबाद आहेत.
हेही वाचा – India Post : नवी मुंबईत नोकरी! ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती
संक्षिप्त धावफलक
- नाणेफेक – भारत (गोलंदाजी)
- ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 469 (ट्रॅव्हिस हेड 163, स्टीव्ह स्मिथ 121, मोहम्मद सिराज 108/4)
- भारत पहिला डाव – सर्वबाद 296 (अजिंक्य रहाणे 89, पॅट कमिन्स 83/3)
- ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 270/8 घोषित (अॅलेक्स कॅरी 66, रवींद्र जडेजा 58/3)
- भारत दुसरा डाव – 164/3 चौथ्या दिवसअखेर
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!