WTC Final 2023 : रोहित शर्माच्या भारतीय खेळाडूंना शिव्या, पाहा Video

WhatsApp Group

WTC Final 2023 Rohit Sharma : आज, इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मॅचचा दुसरा दिवस खेळला जात आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली पण उपाहारानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पुनरागमन करत पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांचा जोरदार पराभव केला. त्याचवेळी, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला आणि त्याच्या गोलंदाजांना शिवीगाळ करताना दिसत आहे.

रोहित शर्माला आला राग

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियासाठी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगला होता पण स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने भारतीय संघाच्या आशा धुळीस मिळवल्या. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात धावा केल्या आणि एकही विकेट पडू दिली नाही. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जेव्हा रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता तेव्हा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच रागावलेला दिसला आणि त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – पाऊस आला रे…! केरळमध्ये मान्सून दाखल, एकूण 7 दिवसांचा विलंब

येथे पाहा व्हिडिओ

या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावा केल्या. आज सामन्याचा दुसरा दिवस खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात आपले शतक पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने यापूर्वीच शतक ठोकले. हेडच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. कॅमेरून ग्रीन स्वस्तात बाद झाला. स्टीव्ह स्मिथने 121 धावा केल्या. मिचेल स्टार्क धावबाद झाला. कॅरीने 48 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment