Coldplay च्या कॉन्सर्टमध्ये रंगेहाथ पकडले गेले CEO आणि HR! व्हायरल व्हिडीओ पाहून पत्नीने…

WhatsApp Group

Coldplay Kisscam CEO HR Affair : बोस्टनच्या जिलेट स्टेडियममध्ये झालेल्या Coldplay च्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. ‘Kiss Cam’ जेव्हा एका कपलवर थांबली, तेव्हा उपस्थित प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले, कारण ते कपल कुणी सामान्य नव्हते, तर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Astronomer चे CEO एंडी बायरन (Andy Byron) आणि HR हेड क्रिस्टिन कॅबॉट (Kristin Cabot) होते!

या व्हिडीओमध्ये हे दोघं एकमेकांच्या मिठीत हरवलेले दिसतात. Coldplay चा मुख्य गायक क्रिस मार्टिन यांनीही स्टेजवरून विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली, “अरे बघा ना या दोघांकडे. कदाचित यांचं अफेयर आहे किंवा हे फक्त खूपच लाजाळू आहेत!” या वाक्यानंतर संपूर्ण स्टेडियम हसून गर्जून उठलं. पण या हास्याखाली एक मोठा वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा – ‘ही’ बातमी वाचून तुमचं अक्षय कुमारवर प्रेम आणखीन वाढेल!

नेटिझन्स संतप्त, CEO ची पत्नी सोशल मीडियावरून ‘Byron’ आडनाव हटवताच चर्चांना उधाण

हा व्हिडीओ TikTok, Reddit आणि X (म्हणजेच Twitter) वर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी CEO बायरनच्या पत्नीबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. एका युजरने लिहिलं, “बिचारी पत्नी, पण निदान खरं समोर आलं.” तर दुसऱ्याने विचारलं, “जर अफेअर नव्हतं, तर मग एवढं जवळजवळ का बसले होते?” या प्रकरणामुळे वर्कप्लेस एथिक्स, कॉर्पोरेट मर्यादा, आणि प्रोफेशनल रिलेशनशिपबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोण आहेत Andy Byron आणि Kristin Cabot?

  • एंडी बायरन – जुलै 2023 मध्ये Astronomer चे CEO झाले. सध्या ते नॉर्थबरोमध्ये पत्नी मेगन केरिगन आणि दोन मुलांसोबत राहत होते.
  • क्रिस्टिन कॅबॉट – नोव्हेंबर 2024 मध्ये HR हेड म्हणून कंपनीत रुजू झाल्या. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, “जादू तेव्हाच घडते, जेव्हा लोक आणि बिझनेस स्ट्रॅटेजी एकत्र येतात.”

अधिकृत प्रतिक्रिया नाही, पण पत्नीने घेतला मोठा निर्णय

या प्रकरणावर अद्याप Astronomer कंपनीकडून किंवा CEO बायरन यांच्याकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. पण त्यांच्या पत्नीने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून ‘Byron’ आडनाव हटवलं असून, यामुळे त्यांच्या वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा आल्याचं स्पष्ट होत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment