धावत्या ट्रेनला लागली आग; हमसफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

Humsafar Train Fire Viral Video : कधी विमानाला आग लागते तर कधी ट्रेनच्या इंजिनला, काय चाललंय ते समजत नाही? अलिकडेच एअर इंडियाचे विमान कोसळले आणि त्यानंतर त्यात आग लागली, या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, आता एका ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

व्हायरल होणारा व्हिडिओ कर्नाटकातील बंगळुरूचा आहे. उदयपूरला जाणाऱ्या हमसफर एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना टळली. वृत्तानुसार, इंजिनमधून धूर निघताना पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ट्रेनमध्ये काही क्षणातच गोंधळ उडाला.

हेही वाचा – ८ वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी लहानपणापासून वाढवलं; फक्त भुंकूनच करतो संवाद!

अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण  

आगीच्या ज्वाळा पाहून ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आग वेळेवर विझवण्यात आली ही दिलासादायक बाब होती, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

लोकांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक म्हणत आहेत की कोणताही अपघात झाला नाही हे पुरेसे आहे. काही जण विचारत आहेत की हमसफर एक्सप्रेसमधील प्रवासी ठीक आहेत का. काही लोक असेही म्हणत आहेत की इंजिन १० किंवा १५ वर्षे जुने असावे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment