

Man Lives In Forest After Breakup : चीनमधील हांगझोऊ शहरातून एक हृदयस्पर्शी आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. Xiaolin नावाच्या एका तरुणाने ब्रेकअपनंतर मिळालेल्या भावनिक धक्क्यामुळे कोणालाही न सांगता मोबाइल, अन्न किंवा पाण्याशिवाय थेट जंगलात 6 दिवस भटकंती केली.
ब्रेकअपचा परिणाम : भावनिक झटका आणि एकाकी प्रवास
Xiaolin चा 20 जून रोजी रात्री उशिरा अचानक गायब झाला. त्याचा लहान भाऊ पोलिसांकडे गेला आणि शोध मोहीम सुरू झाली. Xiaolin आपला फोनही सोडून गेला होता, जे त्याच्या घरातच सापडला. पोलिसांनी ड्रोन, डॉग स्क्वॉड, सोनार उपकरणं आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोध घेतला. मात्र काही दिवस काहीच माहिती मिळाली नाही.
६ दिवस Daliang Mountain च्या जंगलात भटकंती
26 जूनला एक CCTV फुटेज समोर आलं, ज्यामध्ये Xiaolin एका पार्कमध्ये दिसला. पोलिसांनी लगेच त्याला तिथून वाचवलं. तपासात उघड झालं की, त्याने ६ दिवस जंगलात ४० किमीचा प्रवास केला. पहिल्या तीन दिवसांत त्याने काहीही खाल्लं नाही, नंतर झाडांवरील फळं खाल्ली आणि झऱ्यांमधून पाणी पिलं.
कपडे फाटलेलं, शरीर थकलेलं – पण जिद्द कायम
पोलीस अधिकारी झू लीलियांग यांच्या मते, Xiaolin सापडला तेव्हा त्याचे कपडे फाटलेले होते, शरीर थकलेलं होतं. तो एकटाच त्या मानसिक धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे घरी नेलं आणि वैद्यकीय उपचार दिले.
सोशल मीडियावर भावनात्मक लाट
ही घटना इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली आहे. काही यूजर्सनी त्याच्या प्रेमाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एक यूजर म्हणाला, “मोबाइल न घेता निघालेला हे ऐकूनच धक्का बसला!” दुसर्याने लिहिलं, “अशी टोकाची प्रतिक्रिया योग्य नाही, कोणताही नातं इतकं जीवघेणं होऊ नये!”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!