Missing Husband Caught On Instagram Reel : इंस्टाग्राम रीलमुळे एक चकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 8 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला नवरा सापडला आहे. एका महिलेसोबत नवरा रीलमध्ये दिसल्यानंतर त्याची पहिली पत्नी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
गर्भवती पत्नीला सोडून दुसरीकडे संसार…
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र उर्फ बबलू याने 2018 साली आपल्या गर्भवती पत्नी शीलूला सोडून दिलं आणि पंजाबमधील लुधियानामध्ये राहत होता. तेथे त्याने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला, असा आरोप आहे.
हा धक्कादायक प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा शीलूने इंस्टाग्रामवर एक रील पाहिली. त्या व्हिडिओत तिचा पती जितेंद्र एका अनोळखी महिलेसोबत दिसत होता. हे पाहून शीलूने थेट पोलिसांशी संपर्क साधला.
हेही वाचा – यूकेमधील गणेश विसर्जनानंतर भीषण अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ९ जखमी
इंस्टाग्राम व्हिडिओवरून सुरु झाली चौकशी…
पोलिसांनी व्हिडिओमधील व्यक्तीची ओळख पटवली आणि लुधियानामधील स्थान निश्चित केलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि उघड झालं की जितेंद्रने दुसऱ्या लग्नासाठी पत्नीला फसवून पळ काढला होता.
2018 मध्ये मिळाली होती बेपत्ता असल्याची तक्रार
जितेंद्र हा मूळचा आटामऊ गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील यांनी 2018 साली पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी शीलूच्या नातेवाईकांवर आरोपही करण्यात आले होते. शीलूच्या ताज्या तक्रारीनंतर पोलिसांनी जितेंद्रविरुद्ध पहिल्या पत्नीला फसवून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांची एक टीम लुधियानामध्ये पाठवण्यात आली आणि जितेंद्रला अटक करण्यात आली. तो सध्या उत्तर प्रदेशातील हरदोईला आणला जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा