

Muslim Man Loves Bhagwa iPhone 17 Viral Video : अॅप्पलच्या iPhone 17 मालिकेचा आज भारतभर अधिकृत विक्रीचा पहिला दिवस असून दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूतील अॅप्पल स्टोअर्ससमोर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. अनेकांनी आपले जुने iPhone बदलून नवे मॉडेल घेतले आहे, तर काहीजण पहिल्यांदाच ‘Apple Users च्या एलिट’ गटात प्रवेश करत आहेत.
यात सध्या एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. दिल्लीतील साकेत येथील अॅप्पल स्टोअरमध्ये सकाळपासूनच रांगेत उभा असलेल्या एका युवकाने iPhone 17 चे नवीन ‘Cosmic Orange’ म्हणजेच भगवा रंग घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या युवकाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा रंग ‘खतरनाक’ आणि ‘बढिया’ आहे! खास करून भारतात भगव्या रंगाला वेगळं महत्त्व आहे. मी मुस्लिम आहे… पण मला हा भगवा रंग खूप आवडतो!” असे म्हणत त्याने आपल्या नव्या iPhone 17 ला किस केले.
VIDEO | Delhi: After buying the iPhone 17 series phone, a customer says, "I was in the queue since morning, and I am excited to buy the iPhone of this colour. In India, this saffron-coloured phone will become very popular. I am a Muslim, but I love this colour…"#iPhone17… pic.twitter.com/jdMjvx4GVn
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2025
हेही वाचा – रशियाने शोधली कॅन्सरवरील प्रभावी लस! ट्रायलमध्ये 100% यश, पण डॉक्टर म्हणतात…
हा व्हिडिओ पीटीआयने ‘X’ (माजी ट्विटर) वर शेअर केला असून, तो काही तासांत हजारो वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या युवकाच्या विचारांची प्रशंसा केली आहे, तर काहींनी राजकीय संदर्भ जोडण्याचा प्रयत्नही केला आहे.
iPhone 17 विक्रीचे स्वरूप
Apple च्या नवीन iPhone 17 मालिकेची विक्री आजपासून सुरू झाली असून, देशभरातील अधिकृत स्टोअर्ससोबतच Amazon, Flipkart यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहे.
Apple Store India च्या वेबसाइटवरून तसेच अधिकृत रिटेल आउटलेट्समधून ही डिव्हाईस खरेदी करता येईल. Blinkit आणि Zepto सारख्या झटपट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरही ही डिव्हाईस आता 10 मिनिटांत मिळू शकते (निवडक शहरांमध्ये).
Amazon India व Flipkart या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सवलती, EMI पर्याय आणि 2-3 दिवसांत डिलिव्हरीसह लॉन्च ऑफर्सही सुरू आहेत.
‘Cosmic Orange’ म्हणजेच भगव्या रंगाची चर्चा
iPhone 17 मालिकेमध्ये ‘Cosmic Orange’ नावाने सादर करण्यात आलेला नवीन रंग सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. अनेक वापरकर्त्यांनी या रंगाचे कौतुक केले असून, तो iPhone च्या डिझाइनला एकदम वेगळा आणि आकर्षक लूक देतो असे मत आहे.
विशेष म्हणजे, धार्मिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी असतानाही रंगांच्या बाबतीत असे सकारात्मक विचार आणि खुलेपणाचा दाखला या व्हिडिओमुळे समोर आला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा