Ant Smuggling Case : केनियातील नैरोबी विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विदेशी नागरिकाच्या सूटकेसमध्ये 2,200 पेक्षा अधिक जिवंत मुंग्या आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. वन्यजीव तस्करीचा हा प्रकार समोर आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय झांग केकुन हा चीनचा नागरिक आहे. तो नैरोबीतील मुख्य विमानतळावरून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. तपासात त्याच्या सामानातून एकूण 2,238 जिवंत मुंग्या जप्त करण्यात आल्या.
सूटकेसमध्ये कशा सापडल्या मुंग्या?
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, झांगच्या बॅगेतून 1,948 मुंग्या टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या. उर्वरित मुंग्या तीन मऊ टिश्यू पेपरच्या रोलमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रकार पाहून विमानतळावरील अधिकारीही काही काळ स्तब्ध झाले.
Chinese national Zhang Kequn was arrested at Jomo Kenyatta International Airport while he was trying to leave Kenya with more than 2,200 live garden ants in his luggage amid a rise in cases of smuggling of the insects in the African country https://t.co/XbF4fLyLS6 pic.twitter.com/70Jaly9oXm
— Reuters (@Reuters) March 12, 2026
मुंग्यांसाठी लाखो रुपयांची मागणी
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जगभरात काही लोक मुंग्यांच्या वसाहती पाळण्याचा छंद जपतात. या वसाहती मोठ्या पारदर्शक भांड्यांमध्ये ठेवतात, ज्यांना फॉर्मिकेरियम म्हणतात. या भांड्यांमधून मुंग्यांचे सामाजिक जीवन, त्यांचे कामकाज आणि वर्तन स्पष्टपणे पाहता येते. त्यामुळे दुर्मिळ प्रजातींच्या मुंग्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळते.
केनियाच्या पर्यावरणासाठी मोठा धोका
केनिया वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, या मुंग्या स्थानिक परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे त्यांची तस्करी झाल्यास पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते.
आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचा संशय
तपासादरम्यान झांगने कबूल केले की, तो केनियात दोन आठवडे होता आणि त्याला मुंग्या पुरवणारे तीन सहकारी होते. अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून तपास सुरू केला आहे.
याच दिवशी थायलंडच्या बँकॉक शहरातही केनियातून पाठवलेल्या मुंग्यांचा एक साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे ही घटना केवळ एकट्या व्यक्तीची नसून मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याशी संबंधित असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही असे प्रकार
गेल्या वर्षीही चार जणांना हजारो मुंग्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुमारे 7,700 डॉलर दंड ठोठावण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, आता वन्यजीव तस्करी हत्तीच्या सोंडेसारख्या वस्तूंवरून लहान प्रजातींकडे वळत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
सध्या केनिया वन्यजीव विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मुंग्यांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा