पिटबुलने सहा वर्षाच्या मुलाचा कान फाडला! CCTV मध्ये कैद व्हिडिओ, अंगावर काटा आणणारी घटना

WhatsApp Group

Pitbull Attack Delhi : दिल्लीतील उत्तर-पश्चिम प्रेम नगर परिसरात रविवारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. सहा वर्षांच्या निरागस मुलावर पिटबुल कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा उजवा कान फाटून वेगळा झाला, तसेच डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 CCTV मध्ये कैद

CCTV फुटेजनुसार, मुलगा घरासमोर खेळत होता. चेंडू जवळच्या घराकडे गेला आणि त्याच क्षणी शेजाऱ्यांचा पिटबुल जोरात धावत आला व मुलाच्या डोक्यात दात खुपसून कान फाडला. काही सेकंद चाललेल्या अत्यंत भीषण झुंजीत, दोन जणांनी मोठ्या प्रयत्नाने मुलाला पिटबुलच्या जबड्यातून सोडवले.

कुत्र्याच्या मालकाला अटक

तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे प्रेम नगर पोलिसांनी कुत्र्याचा मालक राजेश पाल याला अटक केली आहे.
भा.न्या.सं 291 (प्राण्यांविषयी निष्काळजीपणा) आणि 125(b) (जीवन व सुरक्षेला धोका होईल असे निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – 12,000 वर्षांनंतर ज्वालामुखीचा स्फोट! राखेचा ढग दिल्लीवर; आकाश काळं, शेकडो उड्डाणं रद्द!

आजोबांनी सांगितली हकिकत

पीडित मुलाचे आजोबा कमेेश्वर राय यांनी सांगितले, “माझा नातू दुपारी तीनच्या सुमारास खेळत असताना अचानक पिटबुल सुटला आणि क्षणार्धात त्याच्यावर झेपावला. कुत्र्याने नियंत्रण सोडले होते. डोक्यावर 8-10 खोल जखमा आहेत, संपूर्ण उजवा कान फाटला आहे. दात तुटले आहेत आणि चेहरा पूर्ण जखमी झाला आहे.”

त्यांनी आणखी गंभीर आरोप केला की या कुत्र्याने याआधी देखील चार मुलांवर हल्ला केला होता, पण कारवाई झाली नाही, म्हणून आज अशी गंभीर घटना घडली.

प्रत्यक्षदर्शीचे वर्णन

प्रत्यक्षदर्शी सतीश कुमार यांनी सांगितले, “कुत्र्याने मुलाच्या चेहऱ्यावर चावले आणि तो जोरात रडत होता. आम्ही दोघांनी मिळून कुत्रा ओढून दूर केला. मुलाचा कान हातात घेऊन मी त्याच्या मागे पळत होतो.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment