एका चुकीनं लाखोंचं नुकसान! हँडब्रेक न लावल्याचा थरारक व्हिडिओ, एकदा पाहाच!

WhatsApp Group

Truck Handbrake Fail Viral Video : रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःच्या सुरक्षिततेसोबत इतरांच्या हलगर्जीपणाचाही धोका असतो. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ट्रक ड्रायव्हर गाडी थांबवून हँडब्रेक लावायचं विसरतो आणि काही सेकंदांत कारचं भयानक नुकसान होतं. ही घटना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर @InsaneRealitys या युजरने शेअर केला आहे. फक्त 31 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या 1.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय घडलं नेमकं?

व्हिडिओमध्ये दिसतं की एक मोठा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा आहे. ड्रायव्हर गाडीतून उतरतो, पण हँडब्रेक लावायचं विसरतो. ट्रक थोड्याच वेळात मागे घसरायला लागतो. आधी कुणाचं लक्ष जात नाही, पण काही सेकंदांतच ट्रक मागे असलेल्या कारवर आदळतो. धक्का इतका जबरदस्त असतो की कार पूर्णपणे धडकते आणि ट्रक थांबत नाही. नंतर तो अजून एका कारला धडक देतो आणि अखेरीस दोन्ही गाड्या थेट दरीत कोसळतात.

हेही वाचा – देशात मोठा दहशतवादी कट उधळला! ISIS च्या दहशतवाद्यांना अटक, दोघे मुंबईचे!

या संपूर्ण घटनेदरम्यान काही लोक ट्रक थांबवण्यासाठी धाव घेतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

लोकांचे रिअ‍ॅक्शन्स काय आहेत?

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी ट्रकचालकाच्या बेफिकिरीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलं, “एक छोटीशी चूक आणि लाखोंचं नुकसान.” दुसऱ्याने कमेंट केली, “ड्रायव्हिंगमध्ये हलगर्जीपणा केवळ नुकसानच नव्हे तर मृत्यू देखील आणू शकतो.”

ही घटना वाहनचालकांसाठी एक मोठा धडा आहे – विशेषतः उतार असलेल्या ठिकाणी वाहन उभं करताना हँडब्रेक लावणं अनिवार्य आहे. अन्यथा अशी दुर्घटना कधीही घडू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment