एका व्यक्तीची ६ जिल्ह्यांत सरकारी नोकरी! लाखो रुपये पगार, ९ वर्षांनी फसवणूक उघड!

WhatsApp Group

UP Government Job Scam : उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ‘अर्पित सिंग’ या नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 9 वर्षांपासून सरकारी नोकरी केली जात होती आणि लाखो रुपयांचा पगार उचलला जात होता — पण कोणालाही याची कल्पना नव्हती!

काय आहे प्रकरण?

लाइव हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, ही घटना मे 2016 मध्ये झालेल्या एक्स-रे टेक्निशियन भरतीशी संबंधित आहे. त्या वेळी अर्पित सिंग या नावाच्या व्यक्तीची एक्स-रे टेक्निशियन म्हणून नियुक्ती झाली होती. त्याची मूळ नेमणूक हातरस जिल्ह्यातील मुरसान सीएचसी येथे झाली होती. मात्र तो प्रत्यक्षात रामपूर जिल्ह्यात 9 वर्षांपासून काम करत होता. त्याचा मासिक पगार सुमारे ₹60,000 होता आणि आतापर्यंत तो ₹55 लाखांहून अधिक वेतन घेऊन गेला आहे.

 एकाच नावावर 6 ठिकाणी नोकरी?

‘मानव संपदा पोर्टल’ च्या माहितीवरून हे धक्कादायक प्रकरण समोर आले. यावरून समजते की अर्पित सिंग या नावाने बदायूं, बांदा, बलरामपूर, शामली, फर्रुखाबाद आणि रामपूर या ६ जिल्ह्यांमध्ये नोकरी सुरू होती आणि प्रत्येक ठिकाणी वेतनही दिलं जात होतं. म्हणजेच, या नावाचा संपूर्ण विभागाला ४.५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे!

हेही वाचा – हिमाचल प्रदेश बनलं ‘पूर्ण साक्षर राज्य’; देशातील अवघ्या काही राज्यांमध्ये स्थान, साक्षरता दर 99.3% वर

चौकशी सुरू — एफआयआर नोंद

मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी याप्रकरणी 3 डिप्टी CMO च्या तपास समितीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून लखनऊ पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे आणि चौकशी सुरू केली आहे.
लाइव हिंदुस्तानच्या माहितीनुसार, DG स्तरावरून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुनः एकदा व्हेरिफिकेशन सुरू आहे. जे कोणी फसवणूक करताना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

या घोटाळ्याची भरती अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात झाली होती. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते असलेले अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर सरकारी नोकऱ्यांतील घोटाळ्याचा आरोप केला आहे. पण आता हे प्रकरण त्यांच्याच काळात घडल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे, ते स्वतः या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment