अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या भूमिकेत, लूकची होतेय मोठी चर्चा! कोँणता सिनेमा? कधी येतोय?

WhatsApp Group

Akshaye Khanna Shukracharya New Movie : हनुमान’ या ब्लॉकबस्टर पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा आता आणखी एक दिमाखदार पौराणिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत – ‘महाकाली’! या चित्रपटातून अभिनेता अक्षय खन्नाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून, तो पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि थरार निर्माण झाला आहे.

चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचा गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या लूकमध्ये अक्षय पूर्णपणे वेगळ्या आणि ओळखू न येण्याजोग्या अवतारात दिसत आहेत. त्याचे डोळे पांढरे, लांब पांढरे केस, दाढी, आणि ऋषिंसारख्या जठा यामुळे त्यचा लूक थेट पौराणिक जगतातून उचललेला वाटतो.

दिग्दर्शकाचा सस्पेन्स उघड

प्रशांत वर्मा यांनी आपल्या ‘प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा हा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी अक्षयचा लूक शेअर करताना लिहिलं – “देवतांच्या छायेत विद्रोहाची प्रखर ज्वाला – सादर करत आहोत असुरगुरु शुक्राचार्यच्या भूमिकेत अक्षय खन्ना!”

हेही वाचा – RCB विकली जाणार, IPL 2026 लिलावाआधी ललित मोदींचा मोठा गौप्यस्फोट!

हा लूक समोर येताच सोशल मीडियावर अक्षयचे प्रचंड कौतुक होत आहे. अनेकांनी याला आतापर्यंतचा सर्वात ‘डार्क आणि पावरफुल’ पौराणिक लुक असे म्हटले आहे.

अजूनही रहस्य कायम

चित्रपटाच्या इतर स्टारकास्टबाबत किंवा कथानकाबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या केवळ अक्षय खन्नाचा लुक समोर आल्यामुळेच चाहत्यांमध्ये चर्चेला जोरदार उधाण आले आहे. अनेकजण याला “भारतीय सिनेमा बदलणारं पौराणिक विश्व” म्हणून ओळख देत आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment