करिअर संपलं की पब्लिसिटी स्टंट? अंजली अरोराच्या बारमधील डान्सने सोशल मीडियावर खळबळ

WhatsApp Group

Anjali Arora Bar Dance Viral Video : रिअ‍ॅलिटी शो आणि सोशल मीडियावरील चर्चेत राहणारी अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अलीकडेच थायलंडमधील एका बारमध्ये नाचतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हाइट मिनी ड्रेसमध्ये स्टेजवर बेधुंद होऊन नाचणाऱ्या अंजलीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी थेट तिच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रसिद्ध बार क्लबमधील व्हिडिओ

हा व्हिडीओ थायलंडमधील एका प्रसिद्ध बार क्लबमधील असल्याचं सांगितलं जात आहे.  या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी तिच्या वर्तनावर नाराजी दर्शवली आहे. अंजलीने यापूर्वी ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर व्हायरल व्हिडीओ करून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये झळकली होती. तिथे तिची आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची केमिस्ट्री प्रचंड चर्चेत आली होती.

हेही वाचा – भारत सरकारचा निर्णय! पाकिस्तानविरुद्ध सामना होणार, पण अट आहे खास!

केदारनाथ यात्रा

फक्त ग्लॅमरस आयुष्य नाही, तर अंजलीने अध्यात्माचाही स्पर्श केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बॉयफ्रेंड आकाश संसनवालसोबत केदारनाथ यात्रा केली होती. या यात्रेचा व्हिडीओही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ‘हर हर महादेव’चा जयघोष करत ती हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये केदारनाथ मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजली अरोराचा बारमधील डान्स हा तिच्या आधीच्या प्रतिमेशी फारच विसंगत वाटत आहे, आणि त्यामुळेच सोशल मीडियावर वादंग उफाळून आला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment