१० महिन्यांत घटवलं १५ किलो वजन! भारती सिंहच्या वेट लॉसचं गुपित काय?

WhatsApp Group

Bharti Singh Weight Loss : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंहने तिच्या हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. पण अलीकडेच ती आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. अवघ्या १० महिन्यांत तब्बल १५ किलो वजन घटवून तिने अनेकांना प्रेरणा दिली आहे. विशेष म्हणजे, भारतीने कोणतीही औषधं किंवा महागडी डायट न घेता पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने वजन घटवले आहे. तिच्या या वेट लॉस जर्नीबद्दल जाणून घेऊया.

भारती सिंहचा वेट लॉसचा फॉर्म्युला

1. इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting)

भारती दररोज सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत उपवास करत होती. म्हणजेच ती दररोज सुमारे १६-१७ तास फास्टिंग करत होती. यानंतर ती दिवसात १-२ वेळेसच अन्न घेत होती.

2. पॉर्शन कंट्रोल – अन्न न थांबवता प्रमाणात खाणं

भारतीने आवडतं अन्न पूर्णपणे बंद केलं नाही. तिने पराठा, हलवा यासारख्या खाद्यपदार्थांचा फक्त प्रमाणात आस्वाद घेतला. यामुळे ती जास्त कॅलोरी न घेता वजन कमी करू शकली.

3. ठराविक वेळेस जेवण

तिने खाण्याचा वेळ ठरवून त्यानुसारच अन्न घेतलं. कितीही व्यस्त असली तरी ती वेळेवर जेवायची. यामुळे पाचनक्रिया नीट झाली आणि वजन नियंत्रणात राहिलं.

वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय परिणाम झाला?

भारती म्हणते, “पूर्वी माझं वजन ९१ किलो होतं, आता ते ७६ किलो आहे. आता मला श्वास लागणे, शुगर व अ‍ॅस्थमाच्या त्रासातून बराचसा आराम मिळाला आहेत. मी स्वतःला हलकं आणि एनर्जेटिक वाटतं.”

तुमच्यासाठी टिप्स

जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करू इच्छित असाल, तर भारती सिंहचे हे तीन सोपे नियम नक्की वापरून पहा:

  • वेळेवर अन्न खा
  • इंटरमिटेंट फास्टिंग करा
  • प्रमाणात आवडतं अन्न खा

सल्ला

वरील माहिती ही केवळ सर्वसामान्य मार्गदर्शनासाठी आहे. वजन घटवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment