

Honeymoon In Shillong Movie : शिलॉन्गमध्ये २३ मे रोजी घडलेल्या राजा रघुवंशी मर्डर केसवर आता चित्रपट बनणार आहे. ‘हनीमून इन शिलॉन्ग’ असे या चित्रपटाचे नाव असून, तो राजा रघुवंशीच्या जीवनावर आधारित असणार आहे. दिग्दर्शक एस.पी. निम्बावत आणि राजा यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांच्यात चर्चा होऊन स्क्रिप्ट फाइनल झाली आहे. मात्र, क्लायमॅक्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिनं तिच्या प्रियकरासह ही हत्या केल्याचं आरोप आहे. सध्या सोनम आणि तिचा प्रियकर दोघंही जेलमध्ये आहेत, तर पोलिस तपास अद्याप सुरू आहे. मर्डरच्या केसला अजून न्याय मिळालेला नाही, तरी यावर आधारीत चित्रपटाची घोषणा नवीन वळण घेऊन आली आहे.
राजा रघुवंशी की हत्या पर बनेगी फिल्म
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 30, 2025
नाम होगा- हनीमून इन शिलॉन्ग
पीड़ित परिवार को इंदौर आकर बॉलीवुड डायरेक्टर ने सुनाई कहानी https://t.co/D2AEV84q3K pic.twitter.com/m306QesKjv
हेही वाचा – रक्षाबंधन २०२५ कधी? ८ की ९ ऑगस्ट? जाणून घ्या नेमकी तारीख आणि योग्य मुहूर्त!
चित्रपटात राजावर झालेला विश्वासघात, पोलिसी तपास, आरोपींच्या रिमांडदरम्यान घडलेल्या घटना, आणि एक सामाजिक संदेश हे सर्व दाखवले जाणार आहे. चित्रपटाची ८० टक्के शूटिंग इंदौरमध्ये होणार असून, मुख्य कलाकार मुंबईमधून निवडले जाणार आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!