

Kapil Sharma Canada Cafe Firing Reason : कपिल शर्माने असं काय पाप केले आहे, की लॉरेंस बिश्नोई गँग त्याच्या मागे हात धुवून लागली आहे? सलमान खानसोबत एक शो करणं इतकं महागात पडलंय का? या सगळ्याची खरी कारणं आता समोर येत आहेत आणि हे वाचून तुमचाही थरकाप उडेल.
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा याच्या कनाडा स्थित ‘Caps Cafe’ वर एका महिन्यात दोनदा गोळीबार झाला आणि या गोळीबारामागे लॉरेंस बिश्नोई गँग असल्याचं स्पष्ट झालं. पण हे सगळं का घडलं?
“जो सलमान के साथ काम करेगा, वो मरेगा!”
कपिल शर्मावर का टार्गेट केलं जात आहे याबाबत गँगस्टर हॅरी बॉक्सरचा एक धक्कादायक ऑडिओ समोर आला आहे. या ऑडिओमध्ये हॅरी स्पष्टपणे सांगतो की, “जो सलमान के साथ काम करेगा वो मरेगा… कपिल शर्मा ने उसे अपने शो पर बुलाया, इसलिए उसके रेस्टोरेंट पर गोली चली.” म्हणजेच कपिलनं ‘द कपिल शर्मा शो’च्या नेटफ्लिक्स प्रीमियरवर सलमान खानला गेस्ट म्हणून बोलावलं आणि यामुळे बिश्नोई गँग संतापली!
“आता थेट छातीत गोळी घुसवू!”
या ऑडिओमध्ये हॅरी बॉक्सरनं संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला खुलेआम धमकी दिली आहे. तो म्हणतो, “आता पुढच्या वेळी कोणालाही वॉर्निंग नाही… डायरेक्टर, प्रोड्यूसर, कलाकार – कुणालाही सोडणार नाही… आता थेट छातीत गोळी घुसवू! मुंबईचं वातावरण इतकं खराब करू की सगळे हादरून जातील!” हे विधान केवळ कपिलसाठीच नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक मोठा धोका आहे. कोणत्याही कलाकाराने, डायरेक्टरने, किंवा प्रोड्यूसरने जर सलमानसोबत काम केलं तर त्यांनी स्वतःच्या मृत्यूसाठी तयार राहावं, असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
हेही वाचा – नोकरी करत असतानाही काढू शकता PF मधून पैसे! जाणून घ्या EPFO चे महत्त्वाचे नियम
‘कॅप्स कॅफे’वर दुसऱ्यांदा हल्ला
एका महिन्यात दोन वेळा कपिलच्या ‘कॅप्स कॅफे’वर फायरिंग झालं आहे. पहिल्यांदा लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्यांदा ही घटना घडल्यानंतर आणि हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत आहे. कपिल शर्मा सध्या या धमक्यांमुळे मोठ्या सुरक्षेच्या गरजेत आहे.
बॉलीवूडवर गँगस्टरचा सावट?
बिश्नोई गँगचा दावा आहे की सलमान खान त्यांचा ‘जानी दुश्मन’ आहे आणि जो कोणी त्याच्यासोबत काम करेल, त्यालाही ते टार्गेट करतील. ही फक्त धमकी नाही तर आधीच फायरिंग करून ते आपल्या शब्दाला खरे उतरवत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!