सिरीयसली, ‘ही’ वेबसीरीज पाहिली नाही, तर तुम्ही 2025 मधील बेस्ट थ्रिलर मिस करताय!

WhatsApp Group

Mandala Murders Netflix Review : जर एखाद्या वेबसीरीजच्या नावात “मर्डर” असेल, तर आपोआप वाटतं की ती कोणती तरी टिपिकल मर्डर मिस्ट्री असेल, शेवटी एक खुनी सापडेल, आणि कदाचित कंटेंटचा खून होईल. पण ‘Mandala Murders’ ही अशा साच्यात बसणारी सीरीज नाही. ती एक वेगळी, थक्क करणारी, गुंतवून ठेवणारी आणि मेंदूला हलवून टाकणारी मालिका आहे.

कथा – मंडलच्या अंधाऱ्या जगातली वेगळी सफर

कहाणी आहे ‘चरणदासपूर’ नावाच्या गावाची, जिथे एक बाबा लोकांना वरदान देतो. पण वरदान मिळवण्यासाठी लोकांना आपला अंगठा एका विचित्र मशीनमध्ये घालावा लागतो, अंगठा कापला जातो आणि वरदान मिळतं. हे वरदान मृत्यूवर मात करण्यासारखं असू शकतं. पण यानंतर सुरू होतो एक सस्पेन्सने भरलेला मृत्यूंचा सिलसिला, प्रत्येक मर्डर एका विशिष्ट पॅटर्नने केला जातो. आणि हे सगळं एका ‘मंडल’शी जोडलेलं आहे. तो मंडल काय आहे? का आहे? कोण तयार करतोय तो? हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तर ही सीरीज नेटफ्लिक्सवर नक्की बघा.

सीरीजचं वैशिष्ट्य – कंटेंटचा खरा राजा

आजच्या वेबसीरीजमध्ये जिथं कथा हरवत चालल्या आहेत, तिथं ‘Mandala Murders’ तुम्हाला झटका देणारी, विचार करायला लावणारी आणि एक क्षणही डोळा न हलवता पाहावी लागणारी कथा देते. ही मालिका 8 भागांची असून कुठेही ओढून-ताणलेली वाटत नाही. प्रत्येक सीन गरजेचा वाटतो. मंडलचं एक नवं विश्व इथे तयार केलं गेलंय, जे कल्पनाशक्ती आणि वास्तव यांचा अफलातून मेळ घालतो.

कलाकारांचा अभिनय – वाखाणण्याजोगा परफॉर्मन्स

वाणी कपूर एका तपास अधिकारीच्या भूमिकेत झळकते आणि तिचा हा आजवरच्या इमेजपेक्षा पूर्णतः वेगळा आणि आश्चर्यचकित करणारा अवतार आहे. वैभव राज गुप्ता, ज्यांना आपण ‘गुल्लक’मध्ये पाहिलं होतं, त्यांनी इथे कमाल केली आहे. गुल्लकमधील भूमिकेपेक्षा एकदम विरुद्ध, आणि तितकंच प्रभावी. सुरवीन चावला यांचा अभिनय, स्क्रीन प्रेझेन्स आणि भूमिकेशी असलेली सुसंगती उल्लेखनीय आहे. श्रेया पिळगांवकर कमी स्क्रीन टाइम असूनही प्रभाव टाकते. जमील खान आणि रघुवीर यादव यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे, छोट्या भूमिकाही लक्षात राहतात.

दिग्दर्शन आणि लेखन – एक जबरदस्त टीमवर्क

मनन रावत आणि गोपी पुथरन यांनी दिग्दर्शन आणि लेखनाचं काम केलं असून, त्यांची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते. कथा, संवाद, डिझाईन, आणि संगीत — सगळं एकत्र येऊन एक थरारक अनुभव देतं.

एकंदरीत परिक्षण

जर तुम्ही काही नवं, हटके, आणि मनाला हादरवणारं पाहायला उत्सुक असाल, तर ‘Mandala Murders’ ही सीरीज तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

रेटिंग: ★★★★☆ (4 स्टार्स)

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment