मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ‘नवीन’ रेस्टॉरंट पाहिलंत का? नाव, लोकेशन आणि फोटोज व्हायरल!

WhatsApp Group

Rutuja Bagwe Restaurant Foodcha Paool : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने अभिनय क्षेत्राबरोबरच आता व्यवसाय क्षेत्रात दमदार एंट्री घेतली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व, मरोळ परिसरात तिने स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या हॉटेलचं खास नाव आहे, ‘फूडचं पाऊल’, जे तिनं तिच्या इंस्टाग्रामवरील स्टोरीतून सूचितही केलं होतं, “आयुष्यात पुढचं पाऊल टाकतेय”.

रेस्टॉरंट उद्घाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला अभिनेता सुबोध भावे व त्यांच्या पत्नीची विशेष उपस्थिती होती. यासोबतच मराठीतील अनेक नामवंत कलाकारांनी तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हार्दिक जोशी, सोनाली खरे, हर्षदा खानविलकर, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी महांगडे, केतकी विलास, शर्मिला शिंदे, पूर्वा कौशिक यांसारख्या कलाकारांनी ऋतुजाच्या नव्या वाटचालीचे स्वागत केलं आहे.

हेही वाचा – हे खरंच घडलंय! चिमुकल्याने विषारी सापाला दातांनी मारलं, डॉक्टरही म्हणाले, “अविश्वसनीय!”

 ‘फूडचं पाऊल’मध्ये काय खास?

ऋतुजाच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ उपलब्ध असणार आहेत. खवय्यांसाठी हे ठिकाण एक नविन अ‍ॅड्रेस ठरण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंटच्या आतली पहिली झलक ऋतुजाने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे शेअर केली असून, चाहत्यांकडून ती मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे.

ऋतुजा बागवेचा करिअर प्रवास

ऋतुजा बागवे हिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे. नुकतीच तिने हिंदी मालिका ‘माटी से बंधी डोर’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्याशिवाय ‘अंधारमाया’ या वेबसीरिजमध्येही तिचं महत्त्वपूर्ण योगदान पाहायला मिळालं आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत अभिनयाची विविध रूपं तिने साकारली आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment