कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर मी तासन् तास रडलो…

WhatsApp Group

Sanjay Dutt Cancer News : बॉलीवूडचा सुपरस्टार संजय दत्त हा 80-90 च्या दशकात रुपेरी पडद्यावर गाजलेलं नाव. आजही, वयाच्या 66व्या वर्षी संजय दत्त चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. बॉलिवूडपुरतेच नव्हे, तर आता साउथ इंडस्ट्रीतले दिग्दर्शकही संजू बाबांची पसंती करत आहेत. मात्र त्याचा वैयक्तिक प्रवास तितकाच संघर्षमय राहिला.
कोविड लॉकडाऊनच्या काळात, साल 2020 मध्ये त्याला स्टेज 4 कॅन्सरचं निदान झालं. त्या काळात संजय दत्तला परदेशात उपचारासाठी जायचं होतं, पण वीजा मिळत नव्हता. अशा बिकट प्रसंगी दिग्दर्शक राकेश रोशन (जे स्वतःही कॅन्सरवर मात करून आले होते) यांनी त्यांना मदतीचा हात दिला.

“मी अक्षरशः तासन् तास रडलो…”

एका पॉडकास्टमध्ये बोलताना संजय दत्तने त्या काळाच्या आठवणी जागवल्या. त्याने सांगितलं की, “कोविड लॉकडाऊनमध्ये एक साधा दिवस होता. मी जिना चढताना श्वास घेणं कठीण झालं. मी अंघोळ केली, पण श्वास घेताच येत नव्हता. डॉक्टर्सना बोलावलं. एक्स-रेमध्ये फुफ्फुसात पाणी भरलेलं होतं. सर्वांना टीबी असावा असं वाटलं, पण रिपोर्टमध्ये कॅन्सर निघाला.”

संजय म्हणाला, “माझ्या बहिणीने मला ही बातमी सांगितली. ते ऐकून मी फक्त म्हटलं, ‘ठीक आहे, कॅन्सर झालाय, आता काय?’ पण त्यानंतर मी दोन-तीन तास रडलो… मी माझ्या मुलांबद्दल, बायकोबद्दल, जीवनाबद्दल विचार करत होतो. पण शेवटी मी ठरवलं – मी कमकुवत होणार नाही.”

हेही वाचा – एका व्यक्तीची ६ जिल्ह्यांत सरकारी नोकरी! लाखो रुपये पगार, ९ वर्षांनी फसवणूक उघड!

राकेश रोशन यांची साथ

या काळात अमेरिकेचा व्हिसा नाकारल्यामुळे संजय अडचणीत आला होता. तेव्हा राकेश रोशन यांनी एक तज्ञ डॉक्टर शोधून दिला. संजय म्हणाला, “राकेशजींनी मला आधीच सांगितलं होतं की केस गळतील, उलट्या होतील, थकवा येईल. पण मी डॉक्टरला म्हणालो, ‘माझं काहीच होणार नाही.’ आणि खरंच – मी कीमोथेरपी पूर्ण केली आणि त्याच दिवशी सायकलवर बसलो!”

आज कॅन्सरमुक्त, पण अनुभव अविस्मरणीय

आज संजय दत्त कॅन्सरमुक्त आहे.  त्यांनं स्वतः ही बातमी जाहीर केल्यानंतर त्याचे चाहते आनंदाने भरून आले होते.
त्याने केवळ रोगावर मात केली नाही, तर मानसिकदृष्ट्याही स्वतःला मजबूत ठेवलं. हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतोय.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment