स्मृती इराणी पुन्हा छोट्या पडद्यावर! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ भाग २ प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांमध्ये उत्साह

WhatsApp Group

Smriti Irani Returns As Tulsi : देशातील सर्वात प्रसिद्ध सास-बहू मालिका – क्योंकि सास भी कभी बहू थी आता भाग २ घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा ‘तुलसी विरानी’च्या भूमिकेत झळकणार आहेत स्मृति इराणी – ज्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली होती.

या मालिकेने स्मृतिजींना फक्त लोकप्रियताच नाही, तर राजकीय मंचावरही स्थान दिलं. याच मालिकेनंतर त्या भाजपमध्ये सामील झाल्या आणि मोदी सरकारमध्ये १० वर्षे केंद्रीय मंत्री राहिल्या. अमेठीसारख्या काँग्रेसच्या गडावरून त्यांनी राहुल गांधींना पराभूत करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता.

 ‘तुलसी’चे आधुनिक रूप – सामाजिक भानासह

राजकारणात जरी आज त्या पॉवरफुल स्पोक्सपर्सनअसल्या, तरी ‘तुलसी’ ही भूमिका त्यांच्यासाठी कायमच खास राहिली आहे.”

जिओ-हॉटस्टार वर लवकरच पुन्हा प्रसारित होणाऱ्या या नव्या मालिकेत, तुलसीचा एक नवीन आणि अधिक सामाजिकदृष्ट्या संबंधित अवतार पाहायला मिळणार आहे. सोमवारी संध्याकाळी मालिकेचा प्रोमो रिलीज होणार असून, त्याबाबत चाहत्यांमध्ये उत्साह आहे.

हेही वाचा – “न संपत्ती, न लॉटरी – केवळ मेहनत, संयम आणि साधेपणातून १० वर्षांत ४ कोटींची कमाई!”

नव्या तुलसीचा लुक आधीच व्हायरल झाला असून, आता ही भूमिका केवळ कौटुंबिक कथेपुरती न राहता, मध्यवर्गीयांचे प्रश्न, स्त्रीचं स्थान, आणि सामाजिक गुंतागुंत या मुद्द्यांना स्पर्श करणार आहे.

स्मृति इराणी – अभिनय आणि राजकारणातील नॉटआउट ‘प्लेयर’

स्मृतिजींनी क्रिएटिव्ह नरेटिव्ह ते पॉलिटिकल नरेटिव्ह असा प्रवास केला, जो फारच कमी व्यक्तींना शक्य झाला आहे.
एकीकडे त्या भाजपच्या प्रभावशाली नेत्या आणि प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जातात, तर दुसरीकडे अभिनयातील त्यांची ओळख अजूनही ताजी आणि प्रभावी आहे.

यामुळेच ‘तुलसी विरानी’ पुन्हा प्रेक्षकांसमोर येणं ही नॉस्टॅल्जिक आणि प्रासंगिक घटना आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment