कॅमेरासमोरच भीषण अपघात! प्रसिद्ध स्टंटमॅन राजू यांचा सेटवरच मृत्यू; पाहा थरारक VIDEO

WhatsApp Group

Stuntman Raju Death Viral Video : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान स्टंट करताना प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट मोहनराज ऊर्फ राजू यांचा अपघाती मृत्यू झाला.

हा भीषण अपघात ‘वेट्टूवम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला. SUV गाडीवर स्टंट करताना गाडी एका रॅम्पवरून पलटी झाली आणि जोरात जमिनीवर आदळली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यात राजू यांना गाडीमधून बाहेर काढताना पाहायला मिळत आहे.

कसा घडला अपघात?

१३ जुलै रोजी नागपट्टिनम येथे स्टंट सीन शूट करत असताना राजू SUV गाडी चालवत होते. रॅम्पवरून गाडी हवेत गेल्यानंतर ती संतुलन हरवून उलटली. गाडीचा पुढचा भाग थेट जमिनीवर आदळला आणि या भीषण धडकेत राजू गंभीर जखमी झाले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – सायना नेहवालचा डिवोर्स, पण तिचं करोडोंचं साम्राज्य पाहून थक्क व्हाल!

अभिनेता विशाल याचा भावनिक संदेश

तमिळ अभिनेता विशालने राजू यांच्या निधनावर सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “अजूनही विश्वास बसत नाही की आपले धाडसी स्टंटमॅन राजू यांचे निधन झाले. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांनी माझ्या चित्रपटांमध्ये देखील धोकादायक स्टंट्स केले होते. मी त्यांच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे.”

विशाल यांनी हे फक्त ट्वीट नसून आपली जबाबदारी असल्याचे सांगत राजू यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे वचन दिले आहे.

डायरेक्टर आणि अभिनेता गप्प, चाहत्यांचा संताप

या घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे. मात्र चित्रपटाचा नायक आर्या आणि दिग्दर्शक पा. रंजीत यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही, यावर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment