

Ryan Grantham Sentenced To Lfe Imprisonment : हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम (Ryan Grantham) याला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो रिव्हरडेलमध्ये दिसलेल्या रायन ग्रँथमवर त्याच्या आईच्या हत्येचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने न्यायालयासमोर गुन्हा कबूल केला होता. यानंतर आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रायन आयुष्यात कधीही बंदूक वापरू शकत नाही. तसेच १४ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका होणार नाही.
कॅनडातील व्हँकुव्हर येथील ब्रिटिश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने रायन ग्रँथमला शिक्षा सुनावली आहे. मार्च २०२० मध्ये, रायनने त्याच्या ६४ वर्षीय आईची गोळ्या घालून हत्या केली. त्याची आई बार्बरा वेट पियानो वाजवत असताना रायनने तिच्यावर गोळी झाडली आणि तिचा मृत्यू झाला. सीबीसीच्या अहवालानुसार, न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी न्यायालयाचा निर्णय देताना ही घटना दुःखद, हृदयद्रावक आणि जीवघेणी असल्याचे सांगितले.
हेही वाचा – देवगडमध्ये २२ कोटींची देवमाशाची उलटी जप्त..! सहा जणांना अटक
Ryan Grantham, who appeared in the movie "Diary of a Wimpy Kid" and the hit TV series "Riverdale," pled guilty to killing his own mother in British Columbia, Canada. The actor also allegedly had plans to assassinate Canadian Prime Minister Justin Trudeau. pic.twitter.com/QNzZAZYrsx
— Inside Edition (@InsideEdition) June 17, 2022
Ryan Grantham, the B.C. actor who pleaded guilty to the second-degree murder of his mother Barbara Waite, has been sentenced to life in prison with parole ineligibility of 14 years. https://t.co/qvqkxHxD4k
— CBC British Columbia (@cbcnewsbc) September 21, 2022
जूनमध्ये, रायनच्या खटल्याच्या फिर्यादीने सांगितले होते की अभिनेत्याने ३१ मार्च २०२० रोजी त्याच्या आईला गोळ्या घातल्या होत्या. त्याचा व्हिडीओही त्यांनी बनवला. गो प्रो कॅमेऱ्यात घेतलेल्या या व्हिडिओमध्ये आपली आई बार्बरा वेटच्या निर्जीव मृतदेहाशेजारी उभ्या असलेल्या रायन ग्रँथमने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे, ”मी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी झाडली. नंतर तिला समजले की मी हे केले आहे.”