

अलवर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अलवर जिल्ह्यात एका दाम्पत्यानं एका मुलाला जन्म दिला आहे. जो सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारण पती-पत्नी दोघांचं वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. मुलाला जन्म देणाऱ्या महिलेचे वय ७० वर्षे आहे. तर मुलाच्या वडिलांचे वय ७५ वर्षे आहे. ज्याला आता लग्नाच्या ५४ वर्षांनंतर त्यांना पहिलं मूल झालं आहे. राजस्थानच्या वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रक्रियेद्वारे एवढी वृद्ध जोडपं पालक बनले आहे. अलवर जिल्ह्यातील IVF सेंटर इंडो आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरनं हा चमत्कार केला आहे.
जन्मलेल्या मुलाचं वजन…
मुलाचे वडील गोपीचंद हे माजी सैनिक आहेत. बांगलादेश युद्धादरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागली होती. गोपीचंद सांगतात की, मुलगा झाल्यानंतर आता ते खूप आनंदी आहेत. या वयात आई झाल्यानंतर पत्नी चंद्रावती देखील खूप आनंदी आहे. या वयात मुलाचा जन्म होण्याची ही बहुधा पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांचे म्हणणं आहे, की त्यांच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून हे जोडपं पुन्हा अलवरला आलं आणि त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी उपचार सुरू केले. आयव्हीएफ प्रक्रियेच्या तिसऱ्या प्रयत्नात महिलेनं मुलाला जन्म दिला. या वयात पूर्ण ९ महिने गर्भधारणा करणं आणि त्यानंतर यशस्वी प्रसूती होणं खरोखरच आश्चर्यकारक आहे.
हेही वाचा – प्रकरण हाताबाहेर..! क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाचा नक्की ‘मॅटर’ काय? वाचा!
गोपीचंद हे देखील त्यांच्या वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. १९६८ मध्ये त्यांचं चंद्रावतींशी लग्न झालं, पण खूप प्रयत्न करूनही मूल झालं नाही. त्यानंतर ते सैन्यातून निवृत्त झाले. पत्नीनंही ठिकठिकाणी उपचार घेतले. पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अलवरमधील आयव्हीएफ केंद्रातून पत्नीवर उपचार केले. जन्मलेल्या मुलाचं वजन सुमारे तीन किलो आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे.
इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे मुलाचा जन्म
खरं तर, इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे (IVF) मुलाचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना नाही. सुमारे ४० वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या प्रक्रियेद्वारे भारतात आतापर्यंत सुमारे १० ते १५००० मुलांना जन्म दिला गेला आहे. या तंत्राद्वारे स्त्रीचे अंडाणू आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे मिश्रण केले जाते. आणि हे बीज स्त्रीच्या गर्भाशयात ठेवले जाते. ही प्रक्रिया महागडी आहे.
हेही वाचा – सावधान..! हे १० पदार्थ रोज खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढेलच आणि हार्ट अटॅकही येईल; वेळ काढून वाचा!
कायदा काय सांगतो?
अलीकडे, जून २०२२ मध्ये IVF साठी एक कायदा देखील बनवला गेला आहे, ज्या अंतर्गत ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना IVF द्वारे मूल होऊ शकत नाही. मात्र या जोडप्यानं आधीच नोंदणी केली होती.