VIDEO : पुण्याच्या ९० वर्षीय आजीचं पाकिस्तानात जोरदार स्वागत; ७५ वर्षांनी परतल्या मूळ घरी!

WhatsApp Group

मुंबई : वयाच्या १५व्या वर्षी त्यांना रावळपिंडीतील वडिलोपार्जित घर सोडावं लागलं. रावळपिंडीच्या प्रेमगलीचं ते दुमजली घर जरी चुकलं, पण त्या जुन्या आठवणी क्षणभरही विसरल्या नाहीत. ७५ वर्षांनंतर जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमीवर त्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा पुन्हा जग तिथे परतल्यासारखं त्यांना वाटत होतं. आपलं जुनं घर पाहण्यासाठी रीना वर्मा एकट्याच पाकिस्तानात पोहोचल्या आहेत. ढोल-ताशांच्या तालावर ९० वर्षांच्या रीना वर्मांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

रीना वर्मांच्या स्वागतासाठी सज्जाद हुसैन पोहोचले होते. सज्जाद ही व्यक्ती आह, ज्यानं त्यांना त्यांचे घर शोधण्यात मदत केली. सज्जाद हा रावळपिंडीच्या डीएव्ही कॉलेज रोडवरील बट स्ट्रीटमध्ये राहतो. फाळणीनंतर सज्जाद स्वतः लुधियानाहून रावळपिंडीला गेला होता. अशा प्रकारे वर्मा आणि सज्जादची कथा एकमेकांशी मिळतीजुळती आहे. फाळणीनंतर दोन्ही कुटुंबांना आपापली जागा सोडावी लागली. कोरोना महामारीपूर्वी रीना यांनी फेसबुक ग्रुपवर त्यांच्या घराच्या आठवणी आणि घराला भेट देण्याची इच्छा पोस्टद्वाके व्यक्त केली होती.

फेसबुकवर लिहिली होती पोस्ट..

पुण्यातील रहिवासी असलेल्या रीना वर्मा यांनी तिच्या फेसबुक ग्रुपवर घराबद्दल पोस्ट केल्यावर रावळपिंडी येथील रहिवासी सज्जाद हैदरने ती पोस्ट पाहिली. त्या गृहस्थानं रीना वर्मा यांच्या घराची झडती घेतली आणि त्यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ त्यांना पाठवले. नंतर हे घर मुमताज हुसैन यांना देण्यात आलं. मुमताज हुसेन आता हयात नाहीत, पण त्यांच्या मुली आणि मुलगा आणि नातू इथं राहतात. रीना वर्मा पाकिस्तानात पोहोचल्यावर या लोकांनी त्यांना तिचं जुनं घर दाखवलं.

तीन महिन्यांचा व्हिसा..

पाकिस्ताननं रीना वर्मा यांना तीन महिन्यांचा व्हिसा दिला वाघा-अटारी बॉर्डरवरून त्या १६ जुलैला लाहोरला पोहोचल्या. जेव्हा त्या प्रेम नवस मोहल्ला येथे पोहोचल्या तेव्हा परिसरातील लोकांनी तिचं जोरदार स्वागत केलं. ढोल वाजवून त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वर्माही ढोलकीच्या तालावर नाचत राहिल्या. फाळणीच्या वेळी त्या १५ वर्षांच्या होत्या आणि तेव्हा त्यांना आपलं घर सोडून भारतात यावं लागलं.

”मी इथं खूप आनंदी आहे, पण त्याच बरोबर मला माझे आई-वडील आणि माझ्या भावंडांची आठवण येतेय. मी त्या लोकांसोबत या घरात राहायचे. फाळणीच्या वेळी आम्हाला हे घर सोडावं लागलं. आता इथं आल्यावर मी त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मिस करत आहे”, अशा भावना रीना वर्मा यांनी व्यक्त केल्या.

Leave a comment