फिल्म फ्लॉप होण्याची भीती? हृतिक रोशननं फॅनच्या पायाला लावला हात; पाहा VIDEO!

WhatsApp Group

Hrithik Roshan Touches Fans Feet : ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या खतरनाक लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, हृतिक एका कार्यक्रमात दिसला. या कार्यक्रमादरम्यान, तो सर्वांसमोर स्टेजवर एका चाहत्याच्या पायाला स्पर्श करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या कार्यक्रमात हृतिकच्या चाहत्यांनी अपेक्षेप्रमाणे उत्साहानं सहभाग घेतला. व्हिडिओमध्ये हजारोंच्या गर्दीसमोर स्टेजवर उभा असलेला हृतिक तुम्हाला दिसत आहे. त्यानं पिवळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट घातला आहे, ज्यामध्ये तो खूप छान दिसत आहे. याचदरम्यान असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये हृतिक रोशन स्टेजवर एका लहान मुलाच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅचपूर्वी रोहित शर्माचा ‘तो’ सल्ला ऐकून बाबर आझम लाजला..! VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की कार्यक्रमात हृतिक रोशनचा एक चाहता स्टेजवर येतो, जो अभिनेत्याला त्याच्या इतकं जवळ पाहून त्याच्या पायाला स्पर्श करतो. त्याच वेळी, हृतिक त्याच्या चाहत्याला असं करण्यापासून थांबवतो, त्याचा हात धरतो आणि स्वतः त्या चाहत्याच्या पायाला स्पर्श करतो. अभिनेत्याचा साधा स्वभाव दाखवणाऱ्या या दृश्यां नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

नेटिझन्सकडून कौतुक

हृतिकची ही छोटी क्लिप सोशल मीडियावर खूप ट्रेंड करू लागली आहे विविध ठिकाणी ती शेअर केली जात आहे. शेअर करण्यासोबतच नेटिझन्स व्हिडिओची जोरदार प्रशंसा करत आहेत. ”ह्रतिकला चाहत्यांसाठी असलेला आदर अविश्वसनीय आहे. तो एक डाउन टू अर्थ माणूस आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून समोर आल्या आहेत.

हेही वाचा – KBCच्या मंचावर हे काय घडलं..! ‘उघड्या’ स्पर्धकाला पाहून अमिताभही चक्रावले; पाहा VIDEO

‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सर्वांच्या नजरा सुपरस्टार हृतिककडं लागल्या आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये हृतिकच्या विक्रमच्या खतरनाक लूकची खूप चर्चा होत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटात सैफ अली खाननंही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हृतिकचा हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट हा तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’चा अधिकृत रिमेक आहे. यामध्ये सैफ अली खान आर. माधवनच्या भूमिकेत आहे, तर हृतिक रोशन विजय सेतुपतीच्या भूमिकेत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment