

Vidyut Jammwal Tight Rope Walking : बॉलिवूडचा ‘कमांडो’ अभिनेता विद्युत जमवाल केवळ चित्रपटांमध्ये आपल्या सुपर अॅक्शनने सर्वांनाच रोमांचित करत नाही, तर वास्तविक जीवनातही तो अनेकदा त्याच्या कारनाम्यांनी आश्चर्यचकित करतो. विद्युत जमवाल हा केवळ एक चांगला अभिनेता नाही तर तो जगातील पहिल्या तीन मार्शल कलाकारांपैकी एक आहे. सरावासाठी कोणतीही मर्यादा तो मोडू शकतो हे विद्युतने वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज हा अभिनेता एका दोरीवरून चालताना दिसत आहे. ही दोरी उंच डोंगरांच्या दरम्यान आहे. त्याची हे धाडस पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
विद्युत जमवालने केलेले हा प्रकार पाहू एका यूजरने म्हटले, ”विद्युतची बातच न्यारी आहे.” तर दुसर्याने लिहिले, ”सांभाळून स्टंट करा सर तुमच्या सारखा सूपर हीरो भारत देशाचा मान आहे.” इतरही अशाच पद्धतीने कमेंट करताना दिसतात आणि हार्ट आणि फायर इमोटिकॉन्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
हेही वाचा – Toyota Innova Electric : गाडी घेणाऱ्यांनो जरा थांबा..! इनोव्हाची इलेक्ट्रिक कार पाहा; जाणून घ्या किंमत!
विद्युतने असा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बर्फाळ पाण्यात स्टंट केले आहेत, ज्याचा व्हिडिओही समोर आला होता. त्याने उणे ८ अंश तापमानात बर्फाळ तलावात डुबकी घेतली. काही दिवसांपूर्वी विद्युत जमवालचा ‘खुदा हाफिज २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.